Tirupati Darshan Pass
esakal
बेळगाव : बेळगावहून तिरुपतीला जाणाऱ्यांची (Tirupati Darshan Pass) संख्या वाढत चालली आहे. बेळगावसह देशभरातून तिरुपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तासाठी दर्शन पासची सुविधा केली जाते. दर्शनाचे तिकीट ऑनलाइन पद्धतीने मिळत असल्याने सोय वाढली असली, तरी गेल्या काही महिन्यांत दर्शन पास मिळणे अत्यंत कठीण बनले आहे. फेब्रुवारी महिन्याचे बुकींग सुरू होताच अवघ्या पंधरा मिनिटांत सर्व तिकीटे ‘फुल्ल’ झाल्याने अनेक भाविक निराश झाले आहेत.