Tirupati Temple : आई शप्पथ! संपत्ती ऐकून डोळेच पांढरे होतील, दहा टनापेक्षा जास्त सोनं

मंदिर ट्रस्टने सांगितले की त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत.
Tirupati Temple
Tirupati Templeesakal

Tirupati Temple Trust Assets Declaired : तिरूपती देवस्थान संपूर्ण देशातूलच नव्हे तर विदेशातील भाविकांचंही श्रध्दास्थान आहे. देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या या तिरुमला तिरुपती देवस्थान (TTD) ने शनिवारी एक श्वेतपत्रिका जारी केली. या श्वेतपत्रीकेच्या माध्यमातून त्यांनी तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टकडे असलेली संपत्ती जाहीर केली आहे. यात मुदत ठेवी आणि सोन्याच्या ठेवींसह त्यांच्या मालमत्तेची यादी आहे.

मंदिर ट्रस्टने सांगितले की त्यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 10.3 टन सोन्याच्या ठेवी आहेत. त्यात ₹15,938 कोटी रोख ठेवी आहे.

Tirupati Temple
Tirupati Balaji : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड

तिरुमला तिरुपती देवस्थानने दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, विद्यमान विश्वस्त मंडळाने 2019 पासून आपल्या गुंतवणूकीबद्दलची मार्गदर्शक तत्त्वे अधिक मजबूत केली आहेत. यासोबतच तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष आणि मंडळाने आंध्र प्रदेश सरकारच्या सिक्युरिटीजमध्ये अतिरिक्त निधी गुंतवण्याचा निर्णय घेतल्याच्या सोशल मीडियावरील वृत्त फेटाळून लावले आहे.

Tirupati Temple
Tirupati : ऑनलाईन ticket booking सुरू; विशेष पासही उपलब्ध

ट्रस्टचे म्हणणे आहे की अतिरिक्त रक्कम शेड्यूल्ड बँकांमध्ये गुंतवली जाते. तिरुमला तिरुपती देवस्थानने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, (तेलुगू भाषेतील पत्रकानुसार) "श्रींच्या भक्तांना विनंती आहे की त्यांनी अशा कट रचलेल्या खोट्या प्रचारावर, अफवा अथवा वृत्तांवर विश्वास ठेवू नये. टीटीडीने विविध बँकांमध्ये केलेल्या रोख आणि सोन्याच्या ठेवी अतिशय पारदर्शक पद्धतीने केल्या जातात.

Tirupati Temple
Ayodhya Temple : राममंदिर जानेवारी २०२४ मध्ये भाविकांसाठी खुलं होणार

यात SBI बँकेत 30 सप्टेंबर 2022ला 5,358.11 कोटी रूपये, Union Bank of India मध्ये 1694.25 कोटी रुपये, Bank Of Baroda मध्ये 1839.36 कोटी रुपये, Canera Bank मध्ये 1351 कोटी रुपये, Axis Banket 1006.20 कोटी रुपये, HDFC Limited Bank मध्ये 2122.85 कोटी रुपये, PNB मध्ये 660.43 कोटी रुपये TTD कडून जमा करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com