Tirupati Balaji : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड, जाणून घ्या कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tirupati Balaji Temple

तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या ना कोणत्यातरी कारणानं नेहमी चर्चेत असतं.

Tirupati Balaji : इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं; तिरुपती मंदिराला 50 लाखांचा दंड

तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Temple) कोणत्या ना कोणत्यातरी कारणानं नेहमी चर्चेत असतं. मात्र, आता वेगळंच प्रकरण समोर आलंय. भक्ताला 14 वर्षांसाठी वाट पाहायला लावणाऱ्या तिरुपती मंदिर संस्थानाला ग्राहक न्यायालयानं 50 लाखांचा दंड ठोठावलाय.

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) सलेम येथील ग्राहक न्यायालयानं (Consumer Court) हा निर्णय दिलाय. तामिळनाडूतील भक्त के. आर. हरि भास्कर यांनी तिरुपती मंदिरात वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी तारीख मागितली होती. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांना तारीख मिळत नव्हती. कोरोना महामारीमुळं 2020 मध्ये 80 दिवस मंदिर बंद होतं. त्यामुळं मंदिरात होणारी वस्त्रालंकारासह अनेक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या.

हेही वाचा: बांगलादेशावर रोहिंग्यांचं मोठं ओझं, भारत बजावू शकतो मोठी भूमिका : PM शेख हसीना

तिरुपती संस्थान कोणता निर्णय घेणार?

याच दरम्यान भास्कर यांच्या सेवेची तारीख होती. पण, सेवा बंद राहिल्यामुळं त्यांना सेवा देता आली नाही. त्यामुळं भास्कर यांना संस्थानानं पत्र पाठवलं. या पत्रात मंदिरानं भास्कर यांना विशेष दर्शनासाठी तारीख हवी असल्यास किंवा पैशांचा परतावा हवा असल्यास कळवण्यास सांगितलं होतं. तेव्हा भास्कर यांनी वस्त्रालंकार सेवेसाठी तारीख देण्याची विनंती केली.

हेही वाचा: Bihar : भररस्त्यात RJD नेत्याची गोळ्या झाडून हत्या; लालू-तेजस्वींच्या निकटवर्तीयाचा जागीच मृत्यू

भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात मागितली दाद

पण, संस्थानानं त्यांना सेवेची तारीख न देता पैसे परत घेण्यास सांगितलं. त्यामुळं भास्कर यांनी ग्राहक न्यायालयात दाद मागितली. ग्राहक लवादानं तिरुपती मंदिर संस्थानाला वस्त्रालंकार सेवा देण्यासाठी एक वर्षाच्या आत नवीन तारीख द्या, अन्यथा 50 लाख रुपये दंड भरपाई म्हणून भास्कर यांना देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं संस्थान कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा: VIDEO : भजनात सगळे तल्लीन होते अन् हनुमानाच्या वेशातला कलाकार स्टेजवर कोसळला, पुढं काय झालं पहा

Web Title: Tirupati Balaji Temple Told To Pay Devotee Rs 50 Lakh For 14 Year Wait Consumer Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..