TMC leader Abhishek Banerjee
TMC leader Abhishek Banerjeeesakal

TMC Leader : 'मी पुरुष आहे, पण..'; समलिंगी विवाहाच्या समर्थनार्थ ममता बॅनर्जींच्या पुतण्याचं मोठं वक्तव्य

देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Summary

केंद्र सरकार जाणूनबुजून हे प्रकरण लटकवत आहे. मला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, पण माझा विश्वास आहे की प्रत्येकाला जीवनसाथी निवडण्याचा, प्रेम करण्याचा अधिकार आहे.

नवी दिल्ली : देशात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. न्यायालय याला मान्यता देईल की नाही हे काही दिवसांत कळणार आहे.

मात्र, याचदरम्यान टीएमसी प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी समलैंगिक विवाहाचं समर्थन केलंय.

टीएमसीचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी म्हणाले, प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. या प्रकरणावरून अभिषेक यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. अभिषेक पुढं म्हणाले, केंद्र सरकार जाणूनबुजून हे प्रकरण लटकवत आहे. मला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही, पण माझा विश्वास आहे की प्रत्येकाला जीवनसाथी निवडण्याचा, प्रेम करण्याचा अधिकार आहे. प्रेमाला कोणताही धर्म किंवा जात नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

TMC leader Abhishek Banerjee
Twitter Blue Tick : ट्विटरनं बंद केली ब्ल्यू टिक; विराट, धोनी ते बिग बींपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा यादीत समावेश

TMC नेते पुढं म्हणाले, 'जर मी पुरुष आहे तर मला पुरुष आवडतो, जर मी एक स्त्री आहे, तर मला एक स्त्री आवडते. प्रेमाला कोणतीही सीमा नसते. प्रत्येकाला प्रेम करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे. मग, तो स्त्री असो वा पुरुष.'

TMC leader Abhishek Banerjee
Poonch Terror Attack : ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा होरपळून मृत्यू; लष्करानं शहीद जवानांची यादी केली जाहीर

तत्पूर्वी, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारनं सांगितलं की, 'ते विधिमंडळाच्या कक्षेत येतं आणि या निर्णयाचा समाज, परंपरा आणि विद्यमान कायद्यांवर परिणाम होईल या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सुनावणीत पक्षकार बनवून त्यांचं मतही न्यायालयानं ऐकून घेतलं पाहिजे.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com