esakal | West Bengal Election 2021: पैसे भाजपकडून घ्या, मत तृणमूलला द्या!
sakal

बोलून बातमी शोधा

Election_Vote

भाजप पैशाच्या बदल्यात मत मागत असताना तुम्ही घासाघीस करायला हवी. ते ५०० रुपये देत असतील तर तुम्ही पाच हजार मागा, असेही ते मतदारांना उद्देशून म्हणाले.

West Bengal Election 2021: पैसे भाजपकडून घ्या, मत तृणमूलला द्या!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

West Bengal assembly election 2021: कुमारग्राम/तुफानगंज (पश्‍चिम बंगाल) : मतांसाठी भाजप पैसे वाटप असल्याचा आरोप करीत हे पैसे घेऊन तृणमूल काँग्रेसला मत देण्याचे आवाहन पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केले.

''भाजपची मंडळी मत विकत घेत आहे. ‘कमळा’कडून पैसे घ्या, पण दोन फुलांना (‘तृणमूल’चे पक्ष चिन्ह) मत द्या. ते तुमची फसवणूक करीत असतील तर तुम्हीही तसेच का वागू नये,'' असा सवाल बॅनर्जी यांनी अलीपूरदूर जिल्ह्यातील कुमारग्राममधील प्रचारसभेत गुरुवारी केला. भाजप पैशाच्या बदल्यात मत मागत असताना तुम्ही घासाघीस करायला हवी. ते ५०० रुपये देत असतील तर तुम्ही पाच हजार मागा, असेही ते मतदारांना उद्देशून म्हणाले.

रक्ताच्या तुटवड्याची चिंता नाही; 'A' रक्तगट बनला 'युनिव्हर्सल डोनर'!​

कूचबिहारमधील तुफानगंज येथील अन्य एका सभेत बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, बाहेरील नेते हवे की त्यांची मुलगी ममता बॅनर्जी हव्यात हे जनतेने ठरवायला हवे. भाजपच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवत जनतेच्या किमान अपेक्षा पूर्ण करण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे. केंद्रातील भाजप सरकारच्या काळात गरजेच्या वस्तू, पेट्रोल, गॅसच्या किंमती आकाशाला भिडल्याने नागरिकांचे जिणे अशक्य झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image