रक्ताच्या तुटवड्याची चिंता नाही; 'A' रक्तगट बनला 'युनिव्हर्सल डोनर'!

Blood
Blood

नवी दिल्ली : आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला स्वत: साठी नाही, पण दुसऱ्यासाठी रक्ताची गरज भासली असेल? त्यासाठी तुम्हाला ब्लड बँकेत जावं लागलं असेल. पण तिथं गेल्यावर तुम्हाला हव्या असलेल्या रक्तगटाचं रक्त मिळालं नाही, की निराशा पदरी पडल्याचा अनुभव बऱ्याचजणांना आला असेल. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी एक चांगली बातमी दिली आहे. एका संशोधनानंतर शास्त्रज्ञांनी 'ओ' रक्त गटासोबतच 'ए' रक्तगटालाही वैश्विक दाता (Universal Donor) म्हणून जाहीर केलं आहे. 

याचा अर्थ असा आहे की, आता लोकांना रक्ताचा तुटवडा जाणवणार नाही. कारण 'ओ' आणि 'ए' हे दोन्ही रक्तगट आवश्यकता असल्यास उपयोगी ठरू शकतात. कॅनेडियन वैज्ञानिकांनी एका विशेष बॅक्टेरियल एंजाइम प्रयोगाद्वारे 'ए' रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणून मंजूरी दिली आहे. 

रक्त संक्रमणासाठी (Blood transfusion) समान गट आवश्यक
रक्त संक्रमणासाठी समान रक्तगटाची आवश्यक असते. 'ओ' रक्तगटातील लोक सर्वांना रक्त देऊ शकतात, पण त्यांची संख्या कमी असल्यामुळे जगभरात रक्ताची आवश्यकता पूर्ण होत नाही. यामुळेच शास्त्रज्ञांनी आतड्यात अशा सूक्ष्मजंतूंचा शोध घेतला जे दोन प्रकारचे एंजाइमचे स्राव करतात. या एंजाइमच्या मदतीने 'ए' रक्तगटाला युनिव्हर्सल डोनरमध्ये रुपांतरित केले जाऊ शकते. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. जर ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली, तर मानवजातीसाठी ही एखाद्या क्रांतीहून कमी नसेल, असे मेरीलँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ क्लिनिकल सेंटरच्या हार्वे क्लेन यांनी म्हटलं आहे. 

'ए' रक्तगट बनला युनिव्हर्सल डोनर
'ओ' रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणून आधीच मान्यता मिळाल्यानंतर 'ए' रक्तगटही युनिव्हर्सल डोनर बनू शकतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. याचं उत्तर शास्त्रज्ञांनी दिलं आहे. जर रक्तात असणाऱ्या साखरेच्या कणांना एका विशिष्ट पद्धतीने हटविल्यास ते आरबीसी या घटकावर हल्ला करू शकणार नाहीत. संशोधनात आतड्यात असमारे दोन एंजाइम मिळाले आहेत, जे 'ए' रक्तगटातील आरबीसी भोवती असलेल्या साखरेचे कण खाऊन टाकतात. त्यामुळे 'ए' रक्तगट युनिव्हर्सल डोनरमध्ये रुपांतरित होऊ शकतो. 

मानवामध्ये चार प्रकारचे रक्तगट आढळतात
मानवामध्ये ए, बी, ओ आणि एबी रक्तगट असे रक्तगटाचे चार गट आहेत. आरसीबीच्या सभोवती असणाऱ्या साखरेच्या कणांद्वारे ते ओळखले जातात. जर तुमचा बी रक्तगट असेल आणि तुम्हाला ए रक्तगटाचे रक्त दिले गेले, तर सारखेचे कण ज्यांना आपण अँटीजेन म्हणतो, ते आरबीसीवर हल्ला करून त्यांना नष्ट करतात. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. 

- जगभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com