अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

TMC MP Attack News शनिवारी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींवर हल्ला झाला. यानंतर आता रविवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. यावरून भाजप-टीएमसीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
TMC MP Kalyan Banerjee Injured, BJP Calls It Drama

TMC MP Kalyan Banerjee Injured, BJP Calls It Drama

Esakal

Updated on

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर राजकीय हिसांचार अजूनही सुरू आहे. शनिवारी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जींवर हल्ला झाला. यानंतर आता रविवारी लोकसभा खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला आहे. हुगळी जिल्ह्यातल्या चंडीतला पोलीस ठाण्याच्या बाहेरच ही घटना घडली. या घटनेत कल्याण बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. टीएमसी समर्थक त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सुटकेची मागणी करणारं निवेदन देण्यासाठी पोहोचले होते. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांशी त्यांचा वाद झाला. TMC MP Assaulted After Abhishek Banerjee Attack

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com