एका आमदारांसह 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जून 2019

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भारतीय जनता पक्षाने आज जोरदार धक्का दिला. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी रंग दाखवायला सुरवात केली आहे. आज तृणमूलच्या एका आमदारांसह 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

नौपारा विधानसभा मतदारसंघाच तृणमूल कांग्रेसचे आमदार सुनील सिंह यांच्यासोबत तृणमूलच्या 12 नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना सुनिल सिंह म्हणाले की, पश्चिम बंगालच्या जनतेला 'सबका साथ, सबका विकास'ची गरज आहे आणि देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असल्याने राज्यातही भाजपचेच सरकार बनावे अशी प. बंगालच्या लोकांची इच्छा आहे. 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील 42 लोकसभा मतदारसंघापैकी 22 लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसचे तर 18 लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडूण आले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC Nowpara MLA Sunil Singh and 12 TMC Councillors join BJP