''भाजपमध्ये जाऊन चूक केली, ममतादीदी मला माफ करा''

mamta banarjee
mamta banarjee
Summary

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली.

कोलकाता- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. पण, यात विजय झाला तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचा. निवडणुकीच्या सुरुवातील भाजपने मोठी हवा निर्माण केली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तर निवडणुकीत 200 जागा जिंकण्याचा दावा केला होता. या भाजपच्या हवेचा भूलून तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण, यातील अनेक नेत्यांना आता पश्चाताप होताना दिसत आहे. (TMC rebel Dipendu Biswas writes apology letter to Mamata says joining BJP was bad decision)

दिपेंदू बिस्वास या नेत्यांने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहित माफीची याचना केली आहे. भाजपमध्ये जाणं माझी मोठी चूक होती. तृणमूलमध्ये पुन्हा येण्याची मला एक संधी द्यावी, असं दिपेंदू बिस्वास यांनी पत्रात म्हटलं म्हटलं आहे. मार्च 2021 च्या सुरुवातीला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तृणमूलने त्यांना तिकीट नाकारलं होतं, त्यामुळे त्यांनी भाजपची वाट धरली होती. आता निवडणुका संपल्या आहेत आणि तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आलं आहे. त्यामुळे दिपेंदू बिस्वास पुन्हा टीएमसीमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत.

mamta banarjee
भारतातील स्ट्रेनचं WHO ने केलं नामकरण

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते भाजपत दाखल झाले होते. आमदार, खासदार आणि स्थानिक नेत्यांनीही ममतांची साथ सोडली होती. मात्र, सर्व आव्हानांचा सामना करत ममतांनी सरकार स्थापन केलं. निवडणुकीच्या आधी सोनाली गुहा यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. सोनाली गुहा यांना ममतांच्या अतिशय विश्वासू म्हटलं जात होतं. टीएमसीकडून सोनाली गुहा यांनी चार वेळा आमदारपद भूषावलं होतं. आता सोनाली गुहा पुन्हा टीएमसीच्या वाटेवर आहेत. तसं पत्र लिहून आपल्याला पक्षात घेण्याची विनवणी केली होती. टीएमसीमधून चार वेळा आमदार राहिलेल्या सोनाली गुहा यांनी ममता बॅनर्जींना पत्र लिहिलं होतं. 'भाजपात प्रवेश करून चूक केली, दिदीशिवाय जिवंत राहू शकत नाही,' असं सोनाली यांनी आपल्या पत्रात म्हणत घरवापसी करण्याची विनवणी केली होती. ममतादीदी सत्तेत आल्यापासून किमान डझनभर तरी नेत्यांनी पुन्हा तृणमूलमध्ये येऊ देण्याची विनंती केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com