

TMC rebel MPs face Disqualification Notice
esakal
TMC Rebel MPs: तृणमूल काँग्रेसमधून (TMC) बाहेर पडून नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) सोबत युती केलेल्या २० बंडखोर खासदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी अपात्रतेच्या याचिकेच्या अनुषंगाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी दिलेली दोन आठवड्यांची मुदत गुरुवारी संपली. मात्र, या खासदारांनी अद्याप आपली उत्तरे सादर केलेली नाहीत. उलट, उत्तर दाखल करण्यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, कोलकाता येथे झालेल्या बंडखोर खासदारांच्या बैठकीला २० पैकी केवळ १० जण उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चेला सुरुवात झाली आहे.