

Political Storm in TMC: Rebel MPs Write to NDA for Alliance Support
sakal
कोलकता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी केलेले बंड सहन करावे लागलेल्या ममता बॅनर्जी यांना आज त्या दिल्लीत आल्यानंतर पक्षाच्या खासदारांनीही धक्का दिला. पक्षाच्या २० खासदारांच्या गटाने लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या गटाला स्वतंत्र संसदीय पक्ष म्हणून मान्यता द्यावी आणि सभागृहात बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी या गटाकडून करण्यात आली आहे.