'मोदी हटाओ, देश बचाओ'; तृणमूलच्या घोषणा

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेच्या निषेधार्थ तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी आज पंतप्रधान कार्यालयाबाहेर "मोदी हटोओ, देश बचाओ'च्या घोषणा दिल्या. तृणमूलच्या निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना तृणमूलच्या नेत्या सौगाता रॉय म्हणाल्या, "आम्ही येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा आणि तृणमूल काँग्रेसविरुद्ध सुरू असलेल्या राजकीय वैराचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. भारतीय जनता पक्ष काय म्हणत आहे, याच्याशी आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. आमचा निषेध सुरूच राहणार आहे.' पंतप्रधान कार्यालयाबाहेर एकत्र होण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना रॉय म्हणाल्या, 'केंद्र सरकारच्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या धमक्‍यांनी आणि कृत्यांनी आम्ही भयभीत झालो नसल्याचे दाखविण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत. पश्‍चिम बंगालच्याबाबतीत बोलाचये झाल्यास खासदार सुदीप बंडोपाध्याय यांच्या अटकेनंतर उत्स्फूर्तपणे निदर्शने करण्यात आली. मात्र आमची मुख्य चळवळ ही नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड अडचणीत सापडला आहे.'

दरम्यान, पश्‍चिम बंगालमध्ये बंडोपाध्याय यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसेबाबत भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांना निवेदन दिले आहे. शिष्टमंडळामध्ये भाजप नेते कैलाश विजयवर्गीय, सिद्धार्थनाथ सिंह आणि राहुल सिंहा यांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMS says 'Modi hatao desh bachao' at south block