Udhayanidhi: राज्यपालांचे वक्तव्य योग्य, म्हणूनच सनातन धर्म नष्ट करायचाय; उदयनिधींचा पुनरुच्चार | TN Governor remark that in Tamil Nadu social discrimination major problem Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin statement eliminate Sanatana | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udhayanidhi

Udhayanidhi: राज्यपालांचे वक्तव्य योग्य, म्हणूनच सनातन धर्म नष्ट करायचाय; उदयनिधींचा पुनरुच्चार

नवी दिल्ली- सनातन धर्मावरुन देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि डीएमकेतील मंत्री उदयनिधी यांनी सनातन धर्माला नष्ट करण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरुन भाजपने चांगलेच वाचावरण तापवलं आहे. त्यातच उदयनिधी यांनी पुन्हा एकदा सनातन धर्माला नष्ट करण्याची भाषा केली आहे.(Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin statement eliminate Sanatana)

तमिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी यांनी राज्यामध्ये सामाजिक भेदभाव हा अद्याप गंभीर मुद्दा असल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना उदयनिधी यांनी त्यांच्यावर टीका केली. राज्यपाल जे म्हणत आहेत, तेच आम्ही पण म्हणत आहोत. त्याचमुळे आम्ही म्हणत आहोत की, सनातन धर्म नष्ट करायला हवा. समाजातील जातव्यवस्था ही चुकीची आहे. त्यामुळे आम्ही तिच्याविरोधात लढणार आहोत, असं ते म्हणाले.

राज्यपाल रवी म्हणाले होते की, 'इतर राज्यांच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये भेदभाव जास्त आहे. तरुण आपल्या वेगवेगळ्या धर्माची ओळख जपत आहेत. सामाजिक न्यायाची भाषा करणाऱ्या राज्यासाठी ही शरमेची बाब आहे. राज्यामध्ये जातीच्या नावाने लोकांचे शोषण होत आहे.'

राज्यपालांच्या वक्तव्यानंतर डीएमके पक्षाकडून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमध्ये एका कथित उच्च जातीचा व्यक्ती कथित खालच्या जातीच्या व्यक्तीवर लघवी करतो. यावर कोणी काहीही बोललं नाही. अशा प्रकारच्या भागातून राज्यपाल येतात. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते.

उदयनिधी यांच्या वक्तव्यावरुन देशाच्या राजकारणात गोंधळ निर्माण करण्यात आला आहे. भाजपने उदयनिधी यांच्या वक्तव्याचा मोठा मुद्दा करुन विरोधकांवर टीका सुरु केली आहे. काँग्रेसलाही या मुद्द्यावरुन सावत्र पवित्रा घ्यावा लागला आहे. दुसरीकडे उदयनिधी आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी सनातन धर्म नष्ट करण्याचा पुनरुच्चार केला आहे. (Latest Marathi News)

टॅग्स :Tamil Nadu