आव्हानांचा काळ

सध्या चिरकाळ टिकणाऱ्या विषाणू’बाबत सर्वत्र चर्चा होत असताना, तो जवळपास डझनभर प्रजातींमध्ये पसरला आहे.
Flood
FloodSakal

हवामान बदल, अमेरिका-चीन संघर्ष, कोरोना संकट आणि आर्थिक विषमता या वातावरणातून जगाची वाटचाल होत असताना असमानता निर्माण झाली आहे. हे वातावरण इतक्यात बदलण्याची शक्यता नसली तरी निष्पक्ष व्यवस्थेची निकड निर्माण झाली आहे.

जेव्हा आपण एकामागून एक येणाऱ्या नैसर्गिक, (Natural) अस्मानी संकटाच्या (Disaster) बातम्या वाचतो, तेव्हा प्रश्‍न पडतो की, आपण सध्या चिनी शापानुसार ‘रंजक काळा’त तर जगत नाही ना? सद्यःस्थितीत आपल्यावर एकापेक्षा अधिक नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार असताना त्याचा सामना सध्याची व्यवस्था सक्षमपणे करू शकते काय?, असा प्रश्‍न पडतो. या स्थितीचे आकलन करण्यासाठी एक उदाहरण पाहू. पर्यावरण बदलामुळे सायबेरिया आणि कॅनडाच्या अग्नेय भागात उष्णतेची लाट आणि जंगलांना वणवे लागण्याच्या घटना घडल्या. याच पर्यावरण बदलामुळे गेल्याच आठवड्यात युरोपमध्ये अर्धा डझनाहून अधिक श्रीमंत देशांत महापूर आले. या देशांमधील लोकांना आतापर्यंत पुराच्या फक्त बातम्या ऐकायची आणि वाचायची सवय होती. (TN Ninan Writes about Natural Disasters)

सध्या चिरकाळ टिकणाऱ्या विषाणू’बाबत सर्वत्र चर्चा होत असताना, तो जवळपास डझनभर प्रजातींमध्ये पसरला आहे. विशेष म्हणजे हे सगळे समूह प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचीही शक्यता दिसत नसताना घडते आहे. ‘फॉरेन अफेअर्स’ या मासिकातील एका लेखात कोरोनाचा विषाणू हा नष्ट होण्याऐवजी तो आगामी काळात अधूनमधून पुन्हा सक्रिय होऊ शकतो, असे म्हटले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की आतापर्यंत जे आपले सामान्य जनजीवन सुरू होते, ते नजीकच्या काळातही लवकर पूर्ववत होईल, असे वाटत नाही.

तिसरे म्हणजे, लोकशाही आणि उदारमतवादाचे जे काही युग होते, त्याला सातत्याने ताकद वाढणाऱ्या, अपारदर्शक आणि कोणतीही जबाबदारी नसलेल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठीच्या शस्त्रापासून खुला धोका निर्माण झाला आहे. तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजावर पाळत ठेवण्याची मनीषा बाळगणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या राजकीय नेत्यांपासूनही तसाच धोका आहे. सध्या सर्वत्र पसरलेले कॉर्पोरेट कंपन्यांचे जाळे हे चिंताजनक आहे, परंतु धोका म्हणून त्यांची तीव्रता कमी आहे. आताच योग्य पावले न उचलल्यास हे ‘ऑरविलिअनचे दु:स्वप्न’ ठरेल.

चौथे म्हणजे जागतिक सत्ताकेंद्रात बदलाचे वारे वाहत असल्याने अमेरिका आपले स्थान टिकवण्यासाठी धडपडत आहे. थोडक्यात चीनची सर्वबाजूंनी होणारी वाढ रोखण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. सत्ताकेंद्र बदलताना प्रसंगी युद्धाची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी पहिल्या महायुद्धाचे उदाहरण घेता येईल. जर्मनीचा होत असलेला उदय हे या युद्धामागचे छुपे कारण होते. तत्पूर्वी दशकभरापूर्वी रशिया आणि जपान यांच्यात झालेल्या युद्धामागे अप्रत्यक्षपणे जपानचा उदय हेच प्राथमिक कारण होते.

सध्याच्या काळात नैराश्‍य पसरण्यामागे समाजातील वाढलेली असमानता हे एक कारण होय. ही स्थिती श्रीमंत, गरीब आणि मध्यमवर्गीय असलेल्या देशांतील भविष्यासाठी धोकादायक ठरू शकते. दुर्लक्षित घटकांच्या जाणीवा अधिक जागृत होत असल्याने हा समाज संस्कृतीच्या नावाखाली, वांशिक शत्रुत्वाच्या नावाखाली कठोर वास्तववादापासून पळ काढत आहे. स्वप्नात पाहिलेल्या उज्ज्वल आणि आर्थिक भविष्यासाठी हा वर्ग पर्यायांचा पुन्हा शोध घेत आहे.

यादरम्यान, धोरणकर्ते हे चलनवाढ आणि अस्थिरता असतानाही जोखीम स्वीकारत देशांच्या आर्थिक मर्यादांवर प्रयोग करत आहेत. अशा प्रकारचा विकास हा वित्त यंत्रणेत खोलवर मुळे गुंतलेल्या शक्तींकडून होतो. समाजातील एकोपा नाहीसा होऊ लागला असून अधिक सत्ता आणि संपत्तीच्या हव्यासापोटी तणाव आणखी वाढताना दिसतो. तंत्रज्ञानाचा वाढता पसारा आणि उत्क्रांतीचा पुढील टप्पा म्हणून पृथ्वीबाहेरच वस्ती करण्यासाठी धडपडणाऱ्या शक्तींकडून या विकासाची दिशा ठरविली जात आहे. दुर्दैवाने प्रत्येक विकासकामातून एक गैरसमज पसरवला गेला. या विकासातून आपण आता सर्व जण स्वर्गात जात आहोत, असे सांगितले गेले. परंतु हा केवळ भास असून लेखकाने म्हटल्याप्रमाणे, आपण अगदी विरुद्ध दिशेला जात आहोत. या स्थितीचा सामना कोण कसा करू शकतो? संपूर्ण जग आता हवामान बदलावरून जागे झाले आहे. अर्थात त्याची सुरवात खूप अगोदरपासूनच झाली असून त्याची किंमत आपल्याला मोजावी लागेल. समाजातील असमानता आणि त्यापासून उद्भवणाऱ्या राजकीय धोक्याचा मुकाबला करत आता श्रीमंत लोक त्यांच्या अल्पकालीन स्वार्थापलीकडे जाऊन समाजाकडे पाहतील, अशी स्थिती निर्माण करायला हवी.

कधीकाळी विन्स्टन चर्चिल यांची भूमिका अप्रत्यक्षपणे सुधारकाचीच राहिली आहे. खाण कामगारांना दिवसभरात आठ तासांचे काम, किमान वेतनाचा हक्क, मधल्या सुटीचा अधिकार, नोकरीत बदल, राज्यांची अनुदानित विमा योजना, कामगारांचे शोषण करणाऱ्या कंपन्यांवर, मालकावर खटला भरणे यासारख्या गोष्टीची सुरवात त्यांनी केली. संपत्तीवर कर भरण्यासाठी त्यांनी मोहीम राबविली. ते डावे होते म्हणून नाही, तर शासन व्यवस्थेला सर्वसमावेशक करण्याचा तो एक प्रयत्न होता. आज अशात निष्पक्ष व्यवस्थेची आणि व्यवहाराची गरज आहे. अशा प्रकारची व्यवस्था ही लुप्त होणारी लोकशाही आणि तिच्या स्तंभांना नवीन स्वरूप देण्यास मदत करेल. अन्यथा आपण खोलवर रुजलेल्या विकृतीचे मूळ बाहेर काढू शकणार नाही.

- टी. एन. नैनन

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

(अनुवाद : अरविंद रेणापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com