'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

माजी निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचा कार्यकाळ चांगलाच चर्चेत राहिला होता. एक चांगले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून भारतीय जनता त्यांच्याकडे सन्मानाने पाहते.
 TN Seshan
TN Seshan

नवी दिल्ली- माजी निवडणूक आयुक्त टीएन शेषन यांचा कार्यकाळ चांगलाच चर्चेत राहिला होता. एक चांगले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून भारतीय जनता त्यांच्याकडे सन्मानाने पाहते. टीएन शेषन यांनी निवृत्त झाल्यानंतर राजकारणात देखील नशीब आजमावून पाहिलं. पण, त्यांना त्यात यश आलं नाही. हा किस्सा नेमका काय होता हे आपण जाणून घेऊया.

काँग्रेसकडून टीएन शेषन यांना भाजपचे दिग्गज नेता लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात लोकसभेच्या रिंगणात उभे करण्यात आलं होतं. गुजरातच्या गांधीनगरमध्ये या दोघांमध्ये लढत झाली होती. गुजरात काँग्रेसचे तत्कालीन उपाध्यक्ष बाबूभाई पटेल यांच्याकडून त्यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांना काँग्रेसकडून मिळालेली उमेदवारी सगळ्यांसाठी आश्चर्याची बाब होती. काँग्रेस कार्यकर्ते देखील हैराण झाले होते.

 TN Seshan
Kolhapur Lok Sabha : धर्माच्या नावाखाली ओबीसी, दलित आरक्षणाला धक्का लावयाचा काँग्रेसचा घाट; कोल्हापुरात मोदींचा घणाघात

'मी नाष्ट्यामध्ये राजकीय नेत्यांना खातो' असं टीएन शेषन एकदा म्हणाले होते. टीएन शेषन यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले होते. याकाळात राजकीय नेत्यांचा निवडणूक खर्च मर्यादीत करण्यासाठी कठोर नियम तयार करण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात ते चांगलेच चर्चेत राहिले. टीएन शेषन हे दिल्ली येथे जनपथ येथे सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. याठिकाणी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते.

कारगील युद्धामध्ये भारताचा विजय झाला होता. त्यामुळे लोकांचा कल भाजपकडे होता. त्यावेळी काँग्रेसचे शंकर सिंह वाघेला यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. काँग्रेसकडे लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात उभे करण्यास कोणी शक्तीशाली नेता नव्हता. वाघेला यांनी भविष्यातील स्थिती लक्षात घेत माघार घेतली होती.

 TN Seshan
Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात अभिनेते अमिताभ बच्चन, संजय दत्त, दिलीप कुमार आणि जीनत अमान यांच्या नावाचा देखील विचार झाला होता. पण, अखेर टीएन शेषन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते निवडणूक लढले, पण अडवाणींनी त्यांचा पराभव केला.

टीएन शेषन हे राजीव गांधी यांचे आवडीचे सरकारी अधिकारी होते असं म्हटलं जातं. गांधीनगरमधून लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर टीएन शेषन म्हणाले होते की, मी भारतातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबाच्या नेतृत्त्वातील सर्वश्रेष्ठ पक्षामध्ये प्रवेश करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com