महिन्यातून एक दिवस सायकल वापरा; सिसोदिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिन्यातून एक दिवस सायकल वापरा; सिसोदिया

महिन्यातून एक दिवस सायकल वापरा; सिसोदिया

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण कमी व्हावे म्हणून नागरिकांनी महिन्यातून एक दिवस सायकल वापरावी किंवा बसने प्रवास करावा, असे आवाहन दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

दिल्ली सरकारच्या राहगिरी उपक्रमात सिसोदिया यांनी भाग घेतला. त्यानिमित्त पडपडगंज परिसरातील पश्चिम विनोद नगरमध्ये सायकल फेरीत काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी सायकल चालविली. ते म्हणाले की, प्रदूषणाच्या धोक्यांबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. भावी पिढ्यांसाठी पर्यावरण वाचवायचे असेल लोकांनी किमान एक दिवस या पर्यायांचा अवलंब करावा.

दिल्ली सरकारने राहगिरी प्रतिष्ठानच्या साथीत सुरक्षित आणि स्वच्छ पर्यावरणाला चालना मिळावी म्हणून हा उपक्रम सुरु केला आहे. युद्ध प्रदूषण के विरुद्ध असे त्याचे घोषवाक्य आहे. दिल्लीच्या प्रत्येक कोपऱ्यात हा उपक्रम नेला जाईल. सहा आठवड्यांत सहा ठिकाणी आयोजन केले जाईल.

'प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वाधिक जबाबदारी सरकारची असते. त्यासाठी नियम आणि अटी लागू करणे आवश्यक असते. त्यानंतर औद्योगिक क्षेत्र आणि मग आपण व्यक्ती म्हणून जबाबदार असतो.'

- मनीष सिसोदिया, दिल्लीचे उपमुख्यमंत्री

loading image
go to top