Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र

नियमांचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा असेल, असेदेखील सरकारने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे.
Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र

New Health Warning : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 1 डिसेंबर 2022 पासून तंबाखूपासून तयार केलेल्या उत्पादनांच्या पॅकवर नवीन चित्र प्रकाशित करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. 1 डिसेंबर 2022 पासून किंवा त्यानंतर देशात उत्पादित, आयात केलेल्या किंवा पॅक केलेल्या तंबाखू उत्पादनांच्या पाकीटावरील चित्रात बदल करण्यात येणार आहे. तसेच यावर 'तंबाखूमुळे वेदनादायक मृत्यू होतो' अशा आशयाचा इशारा असणारा मजकूर लिहिलेला असेल. हा नियम एक वर्षासाठी वैध असेल.

Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र
Cabinet Expansion : CM शिंदे अन् शहांमध्ये चर्चा; 60-40 चा फॉर्मुला निश्चित?

अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, पुढील वर्षासाठी 1 डिसेंबर 2023 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित किंवा आयात केलेल्या किंवा पॅक केलेल्या तंबाखू उत्पादनांवर आरोग्यविषयक चेतावणी असलेले चित्र प्रदर्शित केले जावे. त्यावर 'तंबाखू सेवन करणाऱ्यांचा तरुण वयात मृत्यू होतो', असा इशारा लिहिलेला असेल. मंत्रालयाने 21 जुलै रोजी सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) नियम, 2008 मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार नवीन आरोग्य इशाऱ्यांबाबत ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र
मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत; यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का

जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (पॅकेजिंग आणि लेबलिंग) तिसरे दुरुस्ती नियम, 2022 अंतर्गत सुधारित नियम 1 डिसेंबर 2022 पासून लागू होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे ही सूचना http://www.mohfw.gov.in"www.mohfw.gov.in आणि http://ntcp.nhp.gov.in"ntcp.nhp.gov या वेबसाइट्सवर 19 भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Tobacco Warning : तंबाखूजन्य पदार्थांच्या पॅकवर डिसेंबरपासून दिसणार नवे चित्र
मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत; यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का

नियमांचे उल्लंघन मानला जाणार दंडनीय गुन्हा

दरम्यान, जारी करण्यात आलेल्या या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन हा दंडनीय गुन्हा असेल, असेदेखील सरकारने अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. यात सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार आणि वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण) कायदा, 2003 च्या कलम 20 अंतर्गत कारावास किंवा दंडाची तरतूद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com