मुंबई मनपा ओबीसी आरक्षण सोडत; यशवंत जाधव, राखी जाधव, महाडेश्वरांना धक्का

आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी आज मुंबई महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात येत आहे.
BMC
BMCsakal

BMC Election OBC Reservation Draw : आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी आज मुंबई महापालिकेत ओबीसी आरक्षणासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात येत आहे. यात अनेक दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. यामध्ये विश्वनाथ महाडेश्वर, यशवंत जाधव आणि राखी जाधव यांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत लढण्यासाठी या दिग्गजांना दुसरे वॉर्ड शोधावे लागणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नागरिकांचा ओबीसी आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आज ओबीस आरक्षणासाठीची सोडत जाहीर करण्यात येत आहे.

BMC
महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकांना स्थिगिती नाही : मुंबई HC

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एससी, एसटी प्रवर्गाचे यापूर्वी घोषित झालेले आरक्षण वगळता 236 पैकी 219 प्रभागांची आरक्षण लॉटरी आज काढण्यात आली. यामध्ये 219 पैकी 63 प्रभाग हे ओबीसीसाठी आरक्षित झाले आहेत. भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांचा प्रभाग 109 सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभाकर शिंदेना बाजूच्या वॉर्डमधून निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा वॉर्ड क्र. 96 ओबीसी महिला आरक्षित जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनादेखील हा धक्का मानला जात आहे. परंतु विश्वनाथ महाडेश्वर यांच्या पत्नी, माजी नगरसेविका पूजा महाडेश्वर यांना या वॉर्डमधून उमेदवारी मिळू शकेल अशी चर्चा आहे.

BMC
Pune Municipal Election: पुणे महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर

हे वॉर्ड असणार ओबीसी आरक्षित

ओबीसींसाठी आरक्षित असणाऱ्या वॉर्डमध्ये वॉर्ड क्रमांक 3, 7, 9, 12, 13, 27, 30, 38, 40, 42, 48, 51, 53, 62, 76, 79, 81, 87, 89, 101, 110, 117, 128, 129, 132, 135, 137, 146, 147, 148, 150, 152, 154, 155, 159, 161, 164, 174, 179, 180, 183, 185, 188, 195, 200, 202, 203, 217, 218, 222, 223, 230, 236 यांचा समावेश असणार आहे. या वॉर्डांमध्ये मागील तीन निवडणुकांत ओबीसी आरक्षण नव्हतं. यावेळी ओबीसी आरक्षणासाठी अन्य 10 वॉर्डसाठीदेखील लॉटरी काढण्यात आली. यात 17, 82, 96, 73, 16, 127, 98, 61, 173, 130 या वॉर्डचा समावेश असणार आहे.

BMC
Navneet Rana : नवनीत राणांच्या नावे पत्र, सतर्क राहण्याच्या सल्ल्यानं खळबळ!

यशवंत जाधव, राखी जाधव, विश्वनाथ महाडेश्वरांना धक्का

आज जाहीर करण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नगरसेवकांना मोठा धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांचा वॉर्ड क्रमांक 130 ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आला आहे. आधी हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी होता. मात्र, आता हा वॉर्ड आरक्षित झाल्याने राखी जाधवा यांना निवडणुकीसाठी बाजूचे वॉर्ड शोधावे लागणार आहे.

जाधव यांच्यासोबतच या सोडतीत शिवसेनेच्या माजी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनादेखील फटका बसला आहे. विश्वासराव यांचा वॉर्ड 185 ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. यापूर्वी हा वॉर्ड खुल्या प्रवर्गासाठी होता. शिवसेनेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाही आजच्या आरक्षण सोडतीत धक्का बसला असून त्यांचा वॉर्ड 217 ओबीसी महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com