
अतिवृष्टीनंतर शासनाकडून मिळणाऱ्या मदत वाटपात मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर स्पष्ट अन्याय झाल्याचा आरोप करीत संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. समान जमिनी असताना पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हेक्टरी १७ हजार रुपयांच्या तुलनेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केवळ ६ हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे, याला त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. प्रशासनाकडून या उपोषणाकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांचा संताप अधिकच वाढला असून, “प्रशासन निजामाच्या हस्तकाप्रमाणे वागत आहे” असा आरोप करत ते आक्रमक भूमिकेत दिसत आहेत.