PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Sam Pitroda statement : इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापू लागलं आहे
narendra modi
narendra modiEsakal

नवी दिल्ली- इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे राजकारण तापू लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावरुन राहुल गांधी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. तेलंगणातील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, ''शहजादेच्या अंकलनी नवं रहस्य समोर आणलं आहे. ते म्हणाले की काळे दिसणारे लोक आफ्रिकी आहेत. मी आज खुप संतापलो आहे कारण त्यांनी भारतीयांना शिवी दिली आहे.''

सॅम पित्रोदा यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 'भारतात विविधता आहे. दक्षिण भारतातील लोक आफ्रिकन प्रमाणे दिसतात. पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे दिसतात. पश्चिमेकडील अरबांसारखे, तर उत्तरेकडील लोक गोरवर्णीय दिसतात. आपण सर्व एकत्र राहतो. कारण, याचा आपल्याला काही फरक पडत नाही. आपल्यात एकी आहे.'

narendra modi
PM Modi on Pitroda: सॅम पित्रोदांच्या 'वारसा संपत्ती'वरील विधानावर PM मोदींचं भाष्य; म्हणाले, "जिंदगी के साथ भी..."

पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे भाजपला टीकेसाठी आयते कोलित मिळाले आहे. त्यात लोकसभा निवडणुका असल्याने मुद्दा चांगलाच पेटवला जाणार आहे. हाच मुद्दा पकडत मोदींनी काँग्रेसवर घणाघात केला. लोकांच्या त्वचेच्या रंगाच्या आधारे देशातील लोकांचा अपमान केला जात आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला आज कळालं की, काँग्रेस द्रौपती मूर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी का विरोध करत होतं. मूर्मू या आदिवासी कन्या आहेत. शहजादेचे अंकल जे अमिरेकमध्ये राहतात. त्यांनी यासंदर्भात रहस्य उजेडात आणलं आहे. शहजादा या थर्ड अंपायरकडून सल्ला घेतो. शहजादेचे हे फिलोसॉफर म्हणत आहेत की, ज्याच्या त्वचेचा रंग काळा असतो ते सर्व आफ्रिकी असतात.

narendra modi
Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

आज त्यांनी इतकी मोठी शिवी दिली. मला आज कळालं की त्वचेचा रंग पाहून त्यांनी असं समजलं की मूर्मू या आफ्रिकी आहेत. त्यामुळेच त्यांना वाटलं की त्यांना हरवायला हवं. मला आज कळालं याचं डोकं कुठे काम करत आहे? त्वचेचा रंग काहीही असो, आपण सर्व श्रीकृष्णाची पूजा करणारे लोक आहोत, असं मोदी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com