प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे आहे एक सॉलिड सुपर पॉवर, कसा करावा त्याचा वापर?

प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे आहे एक सॉलिड सुपर पॉवर, कसा करावा त्याचा वापर?

यश नितीन धुरी

तुम्ही अनेकदा पाहिले असेल तुमचे आई-वडील आणि आजी-आजोबा जेव्हा बातम्या बघतात तेव्हा ते तणावात असतात. विशेषतः राजकीय बातम्या पाहताना. याचे कारण असे की त्यांच्या पिढीत जेव्हा काही घडायचे तेव्हा ते प्रश्न विचारायचे की हे असे का घडत आहे? ही समस्या कशी सोडवता येईल? पण आजच्या तरुणाईत ते हरवलेले दिसत आहे. तुम्हा सर्वांना वाटते की तुम्ही जॉब किंवा व्यवसायात व्यस्त आहात, पण सत्य हे आहे की “काम से काम रखो” असे तुम्हाला वाटते.

आज प्रत्येकाला स्पायडरमॅन सुपरमॅन प्रमाणे सुपर पॉवर हवी आहे ज्यामुळे ते अख्खं जग बदलू शकतील. पण आपल्याला माहीत नाही की अशी एक सुपर पॉवर आपल्याकडे आहे ज्यामुळे आपण सगळी सिस्टिम चेंज करू शकतो. काय आहे ती सुपरपॉवर ?

तुमच्याकडे एक फायद्याची गोष्ट आहे. जी तुमच्या पालकांकडे नव्हती, ती म्हणजे 'सोशल मीडिया'.

एखाद्या समस्येचे चित्र घ्या, प्रश्न विचारा, स्थानिक राजकारण्यांना टॅग करा, राज्यपालांना टॅग करा आणि अधिकाऱ्यांना टॅग करा. तुम्ही ते आता Google वर काही मिनिटांत शोधू शकता. तुमच्यापैकी अनेकांना राज्यपालाचे नाव माहीत नसेल. बरोबर?

प्रत्येकजण सुपर पॉवरची आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची वाट पाहत आहे, परंतु आजच्या तरुणांकडे सुपर पॉवर आधीपासूनच आहे. मी 'लॉ'चा अभ्यास करत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे हक्क ही सर्वात मोठी सुपर पॉवर आहे जी तुम्ही कधीही मागू शकता. आजच्या तरुणाईला याची जाणीव नाही.

देशाच्या संसदेने आपल्याला माहितीचा अधिकार दिला आहे, प्रश्न विचारणे हा आपला हक्क आहे. पूर्वी अनेकांना आपले प्रश्न विचारू कुठे हाच मुख्य प्रश्न असायचा पण सोशल मीडियाने गरीब श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार प्राप्त करून दिला आहे.

संविधानाने दिलेल्या लोकशाहीच्या अधिकारासोबतच जर आपण सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर या सुपर पॉवरचा परिणाम देशाच्या प्रगतीसाठी नक्की होईल .

चला, तरुणांनो, उठा आणि तुमच्याकडे असलेल्या पॉवरचा वापर करा. समाजात बदल घडवा. ही शक्ती तुम्हाला वापरण्यासाठी बनवली आहे. मला तरुणांना प्रश्न विचारताना आणि त्यांच्या सुपर पावरचा वापर करताना पाहायचे आहे.

यश नितीन धुरी

Representative for the Consumer Protection Cell, Andheri West

Founder & CEO, ACE Security Services

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com