

highway toll agency action news
esakal
Lawyer Assault Case Toll Plaza Uttarpradesh : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे टोल नाक्यावर जिल्हा बार असोसीएशनच्या एका वकिलाला मारहाण करण्यात आली. या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर उसळलेल्या तीव्र संतापाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मोठा निर्णय घेतला आहे. सलग तीन दिवस सुरू असलेल्या वकिलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टोल वसुली करणाऱ्या ‘मेसर्स स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रा. लि.’ या एजन्सीचा करार रद्द केला. यामध्ये टोल वसुली करणाऱ्या कंपनीला एक सॉरी म्हणायला लावण्याच्या नादात ५ कोटी ३० लाखांचा फटका बसला आहे.