

Newly Bought Car Becomes Cause Of Tragic Accident
Esakal
टोल वाचवण्याच्या नादात एका तरुणानं शॉर्टकट जाणारा रस्ता घेतला. पण यामुळे अपघात होऊन जीवाला मुकला. त्याच्यासोबत असलेल्या बहिणीला वाचवण्यात यश आलंय. हरियाणाच्या यमुनानगर इथं हा अपघात झाला. टोलचे १०० रुपये वाचवण्यासाठी त्यानं शॉर्टकट घेतला होता. पण नवी कोरी कार थेट कालव्यात कोसळली आणि यात तरुणाचा मृत्यू झाला. हिंमांशू असं तरुणाचं नाव असून तो एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होता.