
आता संपूर्ण देशभरात समान टोल आकारला जाणार असून यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहेत, येत्या काळात देशभरात समान टोल आकारला जाणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी व वाहनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.