Toll Plaza : नितीन गडकरींची मोठी घोषणा; मोठ्या टोल टॅक्सपासून होणार सुटका

मोठ्या टोल टॅक्सपासून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे.
toll plaza
toll plazaesakal

मोठ्या टोल टॅक्सपासून आता वाहनधारकांची सुटका होणार आहे. नवीन नियमांनुसार टोल टॅक्समध्ये सूट देण्यात येणार आहे. यासंदर्भात संपूर्ण यादीही जारी करण्यात आली आहे.(Toll Tax Rules Nitin Gadkari These people do not have to pay tax )

भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्स संदर्भात मोठी घोषणा केली आहे. आता अनेक लोकांना टोल टॅक्स भरावा लागणारन नाही. यासंदर्भात शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

टोल टॅक्स NHAI कडून वसूल केला जात आसतो. जर आपण हायवेरून चार चाकी वाहनाने प्रवास करत असाल तर, आपल्याला हा टॅक्स द्यावा लागतो. तसेच आपण दूचाकीने प्रवास करत असाल तर आपल्याकडून टोल टॅक्स घेतला जात नाही. दुचाकी वाहन खरेदी करतानाच ग्राहकांकडून रोड टॅक्स घेतला जातो. सध्या टोल टॅक्स वाहनाच्या लांबीवरून आधारीत आहे.

toll plaza
Belgaum News : गावागावांतून पंतप्रधानांना पत्र पाठवा

विशेष म्हणजे, सिंगल जर्नीसाठी टोलची किंमत वेगळी असेल. तसेच, आपल्याकडे रिटर्न टोल टॅक्सचीही व्यवस्था असते. याशिवाय, हायवेवरून सातत्याने प्रवास करणारे लोक पासच्या सुविधेचाही वापर करू शकतात.

या लोकांनाही द्यावा लागणार नाही टॅक्स

भारताचे राष्ट्रपती

भारताचे राष्ट्रपती

भारताचे पंतप्रधान

भारताचे मुख्य न्यायाधीश

भारताचे उपराष्ट्रपती

राज्याचे राज्यपाल

कॅबिनेट मंत्री

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

लोकसभाध्यक्ष

राज्य मंत्री

मुख्यमंत्री

नायब राज्यपाल

सामान्य अथवा समकक्ष रँकचे चीफ ऑफ स्टाफ

कुठल्याही राज्याचे विधानसभा अध्यक्ष

उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

विधान परिषदेचे अध्यक्ष

उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

भारत सरकारचे सचिव

राज्य परिषद

संसद सदस्य आर्मी कमांडर, व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ

संबंधित राज्यांमध्ये राज्य सरकारचे मुख्य सचीव

विधानसभा सदस्य

राज्याच्या दौऱ्यावर असलेले परदेशी मान्यवर

toll plaza
Manas Agro Industries : गडकरींच्या लेकांची कंपनी लॉंच करणार रम आणि व्हिस्कीचे ब्रॅंड

या लोकांनाही द्यावा लागणार नाही टॅक्स -

वर देण्यात आलेल्या यादी व्यतिरिक्त, अर्धसैनिक बल आणि पोलिसांसह वर्दीत असलेले केंद्रीय आणि राज्य सशस्त्र दल, अग्निशमन विभाग, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, राष्ट्रीय महामार्गांची पाहणी, सर्वेक्षण, बांधकाम किंवा ऑपरेशन करणारे लोक, मृतदेह घेऊन जाणारी वाहने, रक्षा मंत्रालय आणि दिव्‍यांगांसाठी तयार करण्यात आलेले मॅकेनिकल वाहनांनाही हा टॅक्स द्यावा लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com