उद्या उघडणार अकराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचा पडदा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात धुमधडाक्‍यात विन्सन वर्ल्ड आयोजित अकराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनसोहळा पणजीतील कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्या म्हणजेच 8 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल.

पणजी : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राज्यात धुमधडाक्‍यात विन्सन वर्ल्ड आयोजित अकराव्या मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनसोहळा पणजीतील कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात उद्या म्हणजेच 8 जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होईल.

उद्‌घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्यासह कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार संजय राऊत, दिग्दर्शक मधुर भांडारकर उपस्थित राहतील. यावर्षीच्या कृतज्ञता पुरस्कारमुर्ती पार्श्‍वगायिका लॉर्ना यांनाही यावेळी गौरविण्यात येणार आहे. महोत्सवाचा पडदा सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या वेलकम होम या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमिअमने उघडणार आहे. 

8 जूनपासून ते 10 जूनपर्यंत हा महोत्सव असणार आहे. राजधानीतील कला अकादमी, आयनॉक्‍स आणि मॅकेनिज पॅलेस या सिनेगृहांमध्ये महोत्सवातील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. आतापर्यंत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सुमारे 1500 चित्रपटप्रेमींनी महोत्सवासाठी नावनोंदणी केलेली असून अद्यापही नावनोंदणी सुरूच आहे. 

या चित्रपटांची मेजवानी - 
यावर्षी रसिकांना पिंपळ (दिग्द. गजेंद्र अहिरे), पळशीची पीटी (दिग्द. धोंडिबा कारंडे), इडक (दिग्द. दिपक गावडे), सत्यजित रे : लाइफ ऍण्ड वर्क (दिग्द. विशाल हळदणकर), गुलाबजाम (दिग्द. सचिन कुंडलकर), न्यूड (दिग्द. रवी जाधव), बबन (दिग्द. भाऊसाहेब कऱ्हाडे), आम्ही दोघी (दिग्द. प्रतिमा जोशी), झिपऱ्या (दिग्द. केदार वैद्य), कच्चा लिंबू (दिग्द. प्रसाद ओक), लेथ जोशी (दिग्द. महेश जोशी), रणांगण (दिग्द. राकेश सारंग), बकेट लिस्ट (दिग्द. तेजस प्रभा विजय देऊस्कर), रेडू (दिग्द. सागर वंजारी), व्हॉटसप लग्न (दिग्द. विश्वास जोशी) या मराठी चित्रपटांसोबत जुझे (दिग्द. मिरांशा नाईक) या सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजत असलेल्या कोकणी चित्रपटही पाहता येईल. तर स्वप्ना जोशी वाघमारे दिग्दर्शित सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने महोत्सवाचा समारोप होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: from tomorrow starts 11th marathi film festival in goa