
भुवनेश्वर : ओडिशा पोलिसांनी कोरापुट जिल्ह्यातील बोईपारिगुडा परिसरातील जंगलात शोधमोहिमेदरम्यान कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमाला आज (ता. २९) अटक केली. छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील कुंजाम हिडमा ऊर्फ मोहन हा बंदी घालण्यात आलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचा क्षेत्रीय समिती सदस्य आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत तो चार प्रमुख नक्षलवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. हिडमाकडून एके-४७ सह शस्त्रसामग्री पोलिसांनी हस्तगत केली आहे.