

$2.20 Million Bounty Maoist Leader Arrested
esakal
माओवादीविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मंगळवारी मोठे यश मिळाले. दिवसभरात सारंडा परिसरात सक्रिय असलेल्या २४ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली, तर रात्री उशिरा सीपीआय (माओवादी) संघटनेचा पॉलिटब्युरो सदस्य आणि २.२० कोटी रुपयांचे बक्षीस घोषित असलेला मिसिर बेसरा याला अटक करण्यात आली. त्याच्यासोबत मेहनत उर्फ मोचू आणि गौरव या दोन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले. धनबाद आणि गिरिडीहच्या सीमेवरील मनियाडीह परिसरात ही कारवाई करण्यात आली. मिसिर बेसरा आणि त्याचे साथीदार धनबाद-गिरिडीह सीमेवरून टाटा मॅजिक वाहनातून प्रवास करत असताना सुरक्षा दलांनी त्यांना पकडले. यावेळी आणखी दोघांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.