esakal | भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; आत्तापर्यंत 26,816 रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19_India

- भारतात कोरोनाचा उद्रेक कायम

- गेल्या 24 तासांत 543 जणांचा मृत्यू

भारतात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; आत्तापर्यंत 26,816 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यानंतर आता भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10,77,618 झाली असून, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,73,379 वर गेली आहे. यातील विशेष बाब म्हणजे 6,77,423 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

देशात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 38,902 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 543 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 3,73,379 वर गेली आहे. आता त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत. तर आत्तापर्यंत सहा लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. भारतात आत्तापर्यंत 26,816 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण

आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 3,00,937 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये 8,348 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एकट्या ठाणे जिल्ह्यात 65,927 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे.

भारत तिसऱ्या स्थानावर

भारतात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. जगभरात अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर ब्राझील या देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आहे. या दोन्ही देशानंतर भारताचा क्रमांक येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत भारत जगात तिसऱ्या स्थानावर आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर सातत्याने लक्ष

सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना सरसकट रुग्णालयात दाखल केले जात नाही. कोरोना पॉझिटिव्ह आहे पण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण केले जात आहे. त्यांच्यावर सातत्याने देखरेखही ठेवली जात आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image