स्टील प्लँटमध्ये मोठी दुर्घटना; गॅस गळतीने घेतला मजुरांचा जीव

सकाळ न्यूज नेटवर्क
Wednesday, 6 January 2021

ओडिशाच्या राऊरकेला स्टील प्लँटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.

नवी दिल्ली- ओडिशाच्या राऊरकेला स्टील प्लँटमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. प्लँटच्या एका युनिटमध्ये विषारी गॅस गळती झाल्याने 4 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सहा लोक आजारी झाले आहेत. राऊरकेला अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दुर्घटना स्थळी केवळ 4 लोक होते, ज्यांचा मृत्यू झाला आहे. 
 
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विषारी कार्बन मोनोऑक्साईड गॅसच्या गळतीमुळे राऊरकेलाच्या स्टील प्लँटच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये मेंटेनेंसचे काम करणाऱ्या चार मजुरांचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ही घटना घडली. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: toxic gas leak in Rourkela Steel Plant Four workers dead

Tags
टॉपिकस
Topic Tags: