शेतकरी आंदोलनात जोश-उत्साह-प्रोत्साहनासाठी डीजे ट्रॅक्टर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 December 2020

जेंव्हा आम्ही गाणी किंवा गुरबाणी ऐकतो तेंव्हा आमचं मन प्रफ्फुलित होतं आणि उत्साह येतो.

नवी दिल्ली : दिल्ली-हरियाणाच्या शिंघू बॉर्डरवर गेल्या 10 दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. कृषी कायद्याविरोधातील हे आंदोलन दिवसेंदिवस जोर पकडत आहे. ऐन थंडीत महिला आणि लहान मुलेही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. आणि आता या आंदोलनातील उत्साह आणि जोश कायम रहावा यासाठी डीजे सिस्टीम असलेला एक ट्रॅक्टर आंदोलनात शेतकऱ्यांना गाण्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन देतो आहे. पंजाबमधील नवनशहरमधील परमिंदर सिंह यांनी या डीजे ट्रॅक्टरविषयीची माहिती दिली. त्यांनी म्हटलं की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही इथे आहोत. पण इथे मनोरंजनासाठी काहीही माध्यम नाहीये. म्हणूनच आम्ही हा ट्रॅक्टर आणला आहे. यामध्ये म्युझिक सिस्टीम आहे. जेंव्हा आम्ही गाणी किंवा गुरबाणी ऐकतो तेंव्हा आमचं मन प्रफ्फुलित होतं आणि उत्साह येतो.

हा डिजे ट्रॅक्टर या आंदोलनातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. प्रोत्साहन देणारी पंजाबी गाणी या ट्रॅक्टरवर वाजवली जात असताना शेतकरी उत्साहाने नाचतानाही दिसत आहेत. दिवसभरातील आंदोलनाला यातून एक वेगळाच जोश संचारताना दिसत आहे. गाण्यांशिवाय आम्ही गुरबाणी देखील ऐकतो. आम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय इथून हलणार नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील याबाबत सहमत करु, असंही त्यांनी म्हटलं. आणखी शेतकऱ्याने म्हटलं की, या गाण्यांमुळे शेतकऱ्यांच्यात उर्जा संचारते आणि त्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळत. आम्ही इथे मोदी सरकारला ते तीन कायदे मागे घेण्यासाठी सांगायला आलो आहोत. आम्ही इथे आमच्या मागण्या शांतपणे ऐकवायला आलो आहोत आणि आम्ही काही दहशतवादी नाहीयोत. सरकारने आम्हाला उकसवू नये. 

हेही वाचा - farmer protest: 8 डिसेंबरला भारत बंदची घोषणा; शेतकऱ्यांचा 'आर या पार'चा निर्धार

दिल्लीच्या सीमेवरील हरयाणा आणि उत्तर प्रदेशातील मुख्य रस्ते या शेतकरी आंदोलनामुळे जाम झाले आहेत. गेल्या 9 दिवसांपासून शेतकरी अत्यंत निकराने हा लढा देत आहेत. शेतकऱ्यांच्या संघटनांनी ठरवलंय की ते 5 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकृतीचे दहन करतील तसेच 8 डिसेंबर रोजी भारत बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tractor DJ in farmers protest against farm laws Singhu border acts as a morale booster for farmers