कोलकाता : नातेवाईकानेच केली तरुणाची गोळ्या झाडून हत्या!

Murder
Murdersakal media

कोलकाता : एका २६ वर्षीय व्यापारी तरुणाची त्याच्या नातेवाईकानेच गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडलीय. दीपक दास असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपीने राजाबाजार (Rajabazar) येथील किराणा दुकानात दीपकवर गोळीबार केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. राकेश दास असं आरोपीचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. राकेश हा बिहार (bihar) राज्यातील नागरिक आहे. पूर्व वैमनस्यातून दीपकची हत्या झाल्याची सूत्रांची माहिती आहे. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (trader shot dead in grocery shop by relative in Kolkata)

Murder
दिल्लीत धक्कादायक घटना : गळा चिरुन महिलेची हत्या; चौघांना ठोकल्या बेड्या

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राकेशचा दिपकवर पूर्वीपासून राग होता त्यामुळे त्याने दीपकची हत्या केली. तसंच या हत्या प्रकरणात त्याला काही सहकाऱ्यांनी मदत केली. दोघांमध्ये पूर्वीपासून वाद होत असल्याने रागाच्या भरात राकेशने दिपकचा खून केला. दीपक नवीन बाजारपेठेत अनेक ठिकाणी चिकनची विक्री करायचा.

" किराणा दुकानात दीपकवर गोळीबार झाला असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होत. मात्र, गंभीर दुखापतीमुळं त्याचा मृत्यू झाला." अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त मुरलीधर शर्मा यांनी दिलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com