

Bijnor Sonpapdi Recipe Supports Hundreds of Families and Preserves Tradition
esakal
भारतामध्ये सणासुदीच्या काळात किंवा आनंदाच्या प्रसंगी मिठाई वाटण्याची परंपरा खूप जुनी आहे. मिठाईचा विषय निघाल्यास काजू-कतली, रसगुल्ला किंवा गुलाबजाम या नावांची चर्चा रंगते. मात्र, उत्तर प्रदेशात एक असा जिल्हा आहे, जिथली 'सोन पापडी' (Soan Papdi) एवढी प्रसिद्ध आणि चवदार आहे की, तिची चव चाखल्यानंतर तुम्ही काजू-कतलीची चवही विसरून जाल!