esakal | ट्रॅफिक पोलिसानेच झाडूने रस्ता केला साफ; सोशल मीडियात व्हिडिओ होतोय व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामध्ये मग कोणताही फोटो, एखादा व्हिडिओ अथवा मिम्स असू शकते.

ट्रॅफिक पोलिसानेच झाडूने रस्ता केला साफ; सोशल मीडियात व्हिडिओ होतोय व्हायरल

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

कटक: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. त्यामध्ये मग कोणताही फोटो, एखादा व्हिडिओ अथवा मिम्स असू शकते. काही लोकांच्या चांगल्या कामांचीही सोशल मीडियावर स्तूती होताना दिसते आणि त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात.

सध्या असाच एक ओडिसामधील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कटकमधील असल्याचे सांगितले जात आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @TazeenQureshy या अकाउंटवरून 17 ऑक्टोबरला शेअर केला गेलेला आहे. 'हा पोलिस कर्मचारी रस्त्यावरील खडे आणि वाळू झाडूने स्वच्छ करत आहे, कारण कुणीही या खड्ड्यांमुळे घसरून पडून जखमी होऊ नये' असं कॅप्शन या व्हिडिओला दिलं आहे.

10 फूट लांब अजगराने घातला महिलेला विळखा; व्हिडिओ व्हायरल

आतापर्यंत या व्हिडिओला 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलं असून अडीच हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तसेच हजारो नेटकरी पोलिस कर्मचाऱ्याच्या या कामाचं कौतुक करत आहेत.  

ओरिसा पोस्ट (Orissa Post)च्या मते, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त सुधांशु सारंगी यांनी ट्रॅफिक पोलिस ललित मोहन यांचा सन्मान केला आहे. ललित यांनी सांगितले की, रस्त्यावरील या खड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास होत होता. यामुळे मी तो रस्ता झाडून स्वच्छ केला. इतर पोलिस कर्मचाऱ्यांनीही ललित यांना या कार्यात मदत केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Pramod Sarawale)