10 फूट लांब अजगराने घातला महिलेला विळखा; व्हिडिओ व्हायरल

प्रमोद सरवळे
Sunday, 25 October 2020

एखाद्या अजगराने जर तुमच्या पायाला घट्ट वेढा घातला तर तुमची काय अवस्था होईल?

क्वीन्सलॅंड: एखाद्या अजगराने जर तुमच्या पायाला घट्ट वेढा घातला तर तुमची काय अवस्था होईल? हो असं झालंय ऑस्ट्रेलियात. क्वीन्सलॅंडमध्ये एका महिलेच्या पायाला अजगराने घट्ट वेढा घातला होता. या मोठ्या प्रसंगाला ऑस्ट्रेलियातील महिलेला सामोरे जावं लागलं आहे. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मांजराला वाचवण्याचा होता प्रयत्न-
सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठा व्हायरल होत आहे. झालं असं की, ही महिला तिच्या मांजराला अजगरापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होती. पण यादरम्यान अचानक अजगराने मांजरावरील लक्ष हटवून त्या महिलेच्या पायालाच घट्ट तिढा घातला. त्या अजगराची पकड एवढी घट्ट होती की शेवटी त्या महिलेला पोलिसांना बोलवावे लागले. हे अजगर तब्बल 10 फूट लांब होते.

पोलिसांकडून व्हिडिओ शेअर तर सोशल मिडीयावर व्हायरल-
महिलेच्या पायाला घातलेला घट्ट आवळ पोलिसांनी कसा सोडवला याचा व्हिडिओ क्वीन्सलॅंड पोलिसांनी शेअर केला आहे. शेअर केलेला हा सोशल मिडियावर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरा 'जेम्स बॉन्ड' सापडला? कधी? कुठं?

यामध्ये त्या महिलेच्या धाडसाचे आणि पोलिसांच्या कार्याचं कौतुक केलं जातंय. या व्हिडिओत महिला पोलिस कर्मचारी पायाला घट्ट तिढा घातलेला अजगराला काढताना दिसत आहे. ते अजगर जंगलातील होते. महत्वाचे म्हणजे ती महिला या प्रसंगावेळी अजिबात घाबरलेली नव्हती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 10 foot long python get attached to foot of woman in Queensland