
उत्तरप्रदेशातील बुलंदशहरमध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे. यात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व बदायूं येथील लग्न समारंभातून दिल्लीला परतत होते. चालकाला झोप लागली, त्यामुळे स्विफ्ट कार एका कल्व्हर्टला धडकली आणि उलटली आणि नंतर तिला आग लागली. आगीनंतर कार लॉक झाली आणि त्यातील लोक बाहेर पडू शकले नाहीत, ज्यामुळे त्यांचा जिवंत जळून मृत्यू झाला. एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.