Woman locked In Bathroom
esakal
Woman locked In Bathroom : कटिहारजवळ रेल्वेतून प्रवास करीत असलेल्या एका महिलेला अतिशय भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. पुढच्या स्टेशनवर ट्रेन थांबताच अचानक ३० ते ४० तिकीट-विना प्रवासी आरक्षित डब्यात घुसले. त्याच वेळी ही महिला बाथरूममध्ये होती, आणि प्रवाशांच्या गोंधळात तिला जबरदस्ती आतच बंद करण्यात आले. हा संपूर्ण प्रसंग महिलेने आपल्या मोबाईलवर चित्रीत केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.