Sex Change : 'आयुष्मान' अंतर्गत ट्रान्सजेंडर करू शकणार मोफत लिंग बदल

Ayushman Bharat Yojana
Ayushman Bharat YojanaSakal

Sex Change : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ट्रान्सजेंडर समुदायाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच ट्रान्सजेंडर मोफत लिंग पुनर्असाइनमेंट शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. सध्या ही शस्त्रक्रिया देशातील कोणत्याही रुग्णालयात मोफत केली जात नाही. याशिवाय आयुष्मान भारत योजनेंतर्गत ट्रान्सजेंडर व्यक्तींना वार्षिक पाच लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधाही मिळणार आहेत. बुधवारी केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजनेचा लाभ ट्रान्सजेंडर समुदायातील लोकांसाठीच्या घोषणा जाहीर केल्या आहेत.

Ayushman Bharat Yojana
Indian Army : भारतावर हल्ल्यासाठी पाकिस्तानी कर्नलने दिले 30 हजार; दहशतवाद्याची कबुली

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया म्हणाले की, आयुष्मान भारत योजनेंतर्गत ट्रान्सजेंडरला वार्षिक पाच लाखांपर्यंत मोफत उपचार सुविधाही मिळणार असून, पात्रतेसाठी ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र अनिवार्य आहे, जे सरकारच्या राष्ट्रीय पोर्टलद्वारे जारी केले जाते. केंद्राकडून घोषणा करण्यात आलेल्या योजनांवर राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करारावरही स्वाक्षरी करण्यात आली आहे.

Ayushman Bharat Yojana
नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यास RSS ची होती संमती; मोठं 'कारण' आलं समोर

कुटुंबाच्या व्याख्येत बदल

डॉ. मांडविया यांनी नवी दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सांगितले की, आयुष्मान योजना कुटुंबांसाठी आहे. परंतु ट्रान्सजेंडर हा समाज कुटुंबाशी जोडलेला नाही. म्हणूनच सरकराने ट्रान्सजेंडर समाजाला पाच लाखांचा विमा देण्यासाठी कुटुंबाची व्याख्या बदलली आहे. देशात 4.80 लाख ट्रान्सजेंडर नोंदणीकृत असल्याचेही ते म्हणाले.

लिंग बदलाचे पॅकेज तयार करण्याचे काम सुरू

एनएचएचे सीईओ डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले की, आयुष्मान भारतच्या 1200 हून अधिक पॅकेजचा लाभ ट्रान्सजेंडरना मिळणार आहे. यासोबतच ते लिंग बदलण्यासही सक्षम असतील. यासंबंधीचे आरोग्य पॅकेज लकरच जाहीर केले जाणार असून, यावर काम सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com