नितीन गडकरींना भाजपच्या संसदीय मंडळातून हटवण्यास RSS ची होती संमती; मोठं 'कारण' आलं समोर

भारतीय जनता पक्षानं मंत्री नितीन गडकरींना पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.
Nitin Gadkari
Nitin Gadkariesakal
Summary

भारतीय जनता पक्षानं मंत्री नितीन गडकरींना पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय.

भाजपच्या (BJP) संघटनात्मक पातळीवरच्या महत्वाच्या नेमणुका नुकत्याच जाहीर झाल्या. त्यात महाराष्ट्रासाठी (Maharashtra) सर्वात मोठा संदेश दडला आहे. नितीन गडकरींची (Nitin Gadkari) पार्लमेंटरी बोर्डातून एक्झिट (BJP Parliamentary Board) हा सगळ्यात मोठा शॉक मानला जातोय.

भाजपच्या पक्षीय संघटनेतला सर्वात मोठा बदल जाहीर झाला असून त्यात सर्वात धक्का महाराष्ट्राचे नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना बसलाय. संसदीय समिती, भाजप पक्षातल्या सर्वोच्च समितीतून नितीन गडकरी यांना वगळण्यात आलंय. त्यात काही महत्वपूर्ण बदल पक्षानं केले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्षानं आपले दिग्गज नेते आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय मंडळातून काढून टाकण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेऊन लोकांना आश्चर्यचकित केलं. मात्र, या निर्णयाला संघ नेतृत्वानंही (RSS) सहमती दर्शवल्याचं बोललं जातंय. गडकरींच्या वक्तव्यामुळं आणि भाष्य करण्याच्या प्रवृत्तीमुळं भाजप आणि संघ दोघंही नाराज झाले होते.

भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघ नेतृत्वानं भाजपचे माजी प्रमुख गडकरींना वेळोवेळी केंद्र सरकार आणि पक्षाबद्दल बोलताना सावध केलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नितीन गडकरींनी संघाच्या दृष्टिकोनाकडं दुर्लक्ष केलं. त्यानंतर आरएसएस नेतृत्त्वानं भाजप नेतृत्वाला सुचवलं की, पक्षानं त्यांना संसदीय मंडळातून काढून टाकण्यासह योग्य ती कारवाई करावी.

Nitin Gadkari
नितीश कुमार बहुमत सिद्ध करण्याआधीच सभापती विजय सिन्हांचा राजीनामा

संघाच्या कठोर भूमिकेमुळं भाजप नेतृत्वाला मदत झाली, जे आधीच गडकरींच्या वक्तव्यामुळं अस्वस्थ होते. त्यानंतर गडकरींना पक्षाच्या सर्वोच्च समितीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. संसदीय मंडळातून गडकरींच्या हकालपट्टीला अनेकांनी कठोर पाऊल मानलंय. भाजपच्या एका वरिष्ठ सूत्रानं सांगितलं की, "भाजपपेक्षा आरएसएस अनेकदा त्यांच्या विधानांनी जास्त नाराज होतं. असं न करण्याचा सल्ला देऊनही नितीनजी अशीच टीका करत असतं."

Nitin Gadkari
मोठी बातमी : प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला अटक होण्याची शक्यता!

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांना संसदीय मंडळातून हटवण्याबाबत सूत्रांनी सांगितलं की, कोणत्याही मुख्यमंत्र्याला मंडळाचा भाग बनवलं जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आलाय. “आता आमच्याकडं बरेच मुख्यमंत्री आहेत आणि आम्ही त्यांच्यात फरक करू शकत नाही.”

Nitin Gadkari
पक्ष सोडल्यास 20 कोटी, दुसरा नेता सोबत आणल्यास 25 कोटी; आप खासदाराचा गौप्यस्फोट

भाजपच्या संसदीय समितीतून गडकरी बाहेर

भाजपच्या संसदीय समितीत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांना संधी दिली गेलीय. तर दुसरीकडं भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना वगळण्यात आलंय. संसदीय समितीत आता अध्यक्ष जे पी नड्डा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, येडीयुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, श्री के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी एल संतोष या अकरा जणांचा समावेश असेल. भाजपच्या या संसदीय समितीत आता महाराष्ट्रातला एकही नेता नाहीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com