esakal | भारतात १७ जणांवर उपचार; अनेकांना वेगळे राहण्याच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर निरीक्षणासाठी इंडो-तिबेट सीमा पोलिसांनी उभारलेल्या स्वतंत्र कक्षात कॅरम खेळताना चिमुुकली.

पारंपरिक चिनी औषधांचा वापर
बीजिंग : कोरोना विषाणूच्या प्रसाराचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमधील हुबेई प्रांतामध्ये तेथील रुग्णांवर उपचार करण्यासाठी चीन सरकारने पारंपरिक चिनी औषधांचा वापर केल्याची बाब उघड झाली आहे. पाश्‍चात्त्य आणि चिनी औषधे या दोन्हींचा उपचारासाठी संयुक्तपणे वापर करण्यात आला, असे चीनच्या राष्ट्रीय आयोगाचे उपाध्यक्ष वँग हेशेंग यांनी सांगितले. हुबेईमधील रुग्णांवरील उपचारासाठी ‘टीसीएम’ या औषधांचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने विकसित केलेल्या रेमदेसिवीर या औषधाचाही प्रायोगिक तत्त्वावर चिनी अधिकाऱ्यांनी वापर केला. देशभरातील २ हजार २२० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना चीनने हुबेईमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी पाठविले होते. जगभरात आत्तापर्यंत ६७ हजार लोकांना या विषाणूची लागण झाली आहे.

भारतात १७ जणांवर उपचार; अनेकांना वेगळे राहण्याच्या सूचना

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - चीनमधील कोरोना विषाणूंनी जगभर हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच देशांनी विमानतळांवर स्क्रिनिंग टेस्टला सुरुवात केली होती, यामध्ये भारताचाही समावेश आहे. पण या तपासणीला सुरुवात होण्यापूर्वीच म्हणजे जानेवारीच्या मध्यावधीत चीन आणि अन्य कोरोनाग्रस्त देशांतून मायदेशी परतलेल्या रुग्णांमध्येही कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यातील सतरा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीतील आरोग्य विभागाने अशी लक्षणे आढळून आलेल्या काही संशयितांना तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत ५ हजार ७०० लोक मायदेशात परतले आहेत, यामध्ये ४ हजार ७०७ संशयितांना जाणीवपूर्वक वेगळे राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अद्याप ८०७ नागरिकांचा पत्ता लागलेला नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. हे सगळेजण चीन, हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमधून मायदेशी आलेले आहेत.

प्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर

अडकलेल्यांची सुटका होणार
टोकियो : जपानच्या किनाऱ्यावर जहाजामध्ये अडकून पडलेल्या तीन कोरोनाग्रस्त भारतीयांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जहाजावरील २१८ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले असून, यामध्ये तीन भारतीयांचाही समावेश आहे. या जहाजाला वेगळे ठेवण्यासाठी निश्‍चित करण्यात आलेला कालावधी संपुष्टात आल्यानंतर सर्वांना मायदेशी आणले जाणार असल्याचे भारतीय दूतावासाने म्हटले आहे.

loading image