
झाडांनाही पेन्शन मिळू शकते असे तुम्ही कधी ऐकले आहे का? तर याचे उत्तर आहे हो... हरियाणा सरकारच्या अनोख्या प्राण वायु देवता योजनेअंतर्गत ७५ वर्षांपेक्षा जास्त जुनी झाडे राखणाऱ्यांना वार्षिक ३००० रुपये पेन्शन दिले जात आहे. ही बातमी केवळ पर्यावरण प्रेमींसाठीच नाही तर आपल्या सभोवतालची हिरवळ वाचवू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली बातमी आहे.