'रिश्‍वतखोर_PM_Modi' ट्विटरवर ट्रेण्ड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

 • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
 • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
 • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे.

राहुल यांनी बुधवारी गुजरातमधील जाहीर सभेत बोलताना मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. त्यानंतर सोशल मिडियावरही या विषयाची चर्चा सुरू अहे. आज सकाळी ट्विटरवर याच विषयाचा "रिश्‍वतखोर_PM_Modi' असा ट्रेण्ड आढळून येत आहे. याशिवाय, #pmshouldresign असाही विषय आज चर्चेत आहे. त्यावर नेटिझन्स प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

त्यातील काही निवडक प्रतिक्रिया :

 • मोदी यांनी चौकशीला सामोरे जाऊन स्वत:चा निरपराधपणा सिद्ध करण्याचे धैर्य दाखवावे.- सीमा
 • गेल्या अनेक वर्षांपासून 125 कोटी जनतेला मूर्ख बनविणाऱ्याला राहुल गांधी यांनी उघड पाडले. - वरूण पाटील
 • राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षासाठी गुजरातमध्ये भूकंप घडविला. रवीशंकरी प्रसाद, संबित पात्रा, श्रीकांत शर्मा आणि जीव्हीएल राव बचावासाठी आले आहेत. - दिवाकर#RG
 • राहुल गांधी यांनी खुलासा केल्याने औद्योगिक कचऱ्यामुळे "गंगा' प्रदूषित झाल्याचे अनेक वर्षांचे सत्य समोर आले. - नवीन खैतान
 • मोदी यांनी अर्थशास्त्रातील पदवीपूर्व अभ्यासक्रम करावा. वरवरच्या अर्थशास्त्रात नोटाबंदी हा विषय येत नाही.- मोहम्मद नौशाद
 • याला म्हणतात "सर्जिकल स्ट्राईक'. राहुलजी यांनी साडे चौदा वर्षांपासूनच्या असत्याचा "सर्जिकल स्ट्राईक' केला. - फरिदा पटेल
 • जर लाच घेतली असेल तर 50 टक्के कर देऊन ते पैसे पांढरे करून घेता येईल. - अनम सुलतान खान
 • आमच्या पंतप्रधानांवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप. अब्रूनुकसानीची तक्रार तर द्यायलाच हवी ना - जीएस सोधी
 • जे लिहून दिले आहे ते राहुल गांधी वाचतात. पक्ष वाह वाह म्हणतो. जनता हा हा म्हणते - सचिन शर्मा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trend in Twitter about PM Modi