हिंदूंसाठी केलेले कायदे आदिवासींना का लागू होत नाहीत?

Tribal Hindu Law News
Tribal Hindu Law NewsTribal Hindu Law News

नवी दिल्ली : द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या राष्ट्रपती झाल्यानंतर आदिवासींनी (Tribal) पुन्हा एकदा स्वत:साठी स्वतंत्र धर्म संहितेची मागणी तीव्र केली आहे. आदिवासी अनेक वर्षांपासून सरना धर्म संहिता लागू करण्याची मागणी करीत आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन यांच्या सरकारनेही ‘सरना आदिवासी धर्म संहिता’ विधेयक मंजूर केले. परंतु, ते केंद्र सरकारकडे अडकले आहे. आदिवासींमध्ये एक मोठा वर्ग आहे जो स्वतःला हिंदू मानत नाही. झारखंडमध्ये (Jharkhand) आदिवासींची सर्वाधिक लोकसंख्या आहे. हे आदिवासी स्वत:चे वर्णन ‘सरना धर्म’ म्हणून करतात.

अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासींना (Tribal) घटनेत ‘हिंदू’ (Hindu) मानले गेले आहे. परंतु, असे अनेक कायदे आहेत जे त्यांना लागू होत नाहीत. हिंदू विवाह कायदा १९५५, हिंदू उत्तराधिकार कायदा १९५६ आणि हिंदू दत्तक आणि देखभाल कायदा १९५६ चे कलम २(२) आणि हिंदू प्रौढत्व आणि पालकत्व कायदा १९५६ चे कलम ३(२) अनुसूचित जमातींना लागू होत नाहीत. याचे एक कारण असे आहे की, शेकडो जमाती आणि उपजमातींमध्ये विवाह, घटस्फोट आणि वारसाहक्काबाबत स्वतःच्या प्रथा आणि परंपरा आहेत.

Tribal Hindu Law News
म्यानमारमध्ये ४ लोकशाही समर्थकांना फाशी; ५० वर्षांत प्रथमच

२००१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका प्रकरणात निर्णय दिला की, अनुसूचित जमातीचे लोक हिंदू धर्माचे पालन करतात. परंतु, ते हिंदू विवाह कायद्याच्या कलम २(२) च्या कक्षेबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना आयपीसीच्या कलम ४९४ (बहुपत्नीत्व) अंतर्गत दोषी ठरवता येणार नाही. याअंतर्गत २००५ मध्ये एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, अनुसूचित जमातीचे लोक त्यांच्या समुदायाच्या रीतीरिवाजांनुसार लग्न करू शकतात.

आदिवासी हिंदू नाहीत का?

  • आदिवासी स्वतःला हिंदू मानत नाही. परंतु, याचा अर्थ असा नाही की सगळेच आदिवासी स्वतःला हिंदू समजत नाही. स्वतःला हिंदू नसून सरना समजणारा मोठा वर्ग आहे.

  • सरना म्हणजे निसर्गाची पूजा करणारे लोक. झारखंडमध्ये सरना धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. हे लोक कोणत्याही देवाची किंवा मूर्तीची पूजा करीत नाही.

  • जे स्वतःला सरना धर्माचे समजतात ते तीन प्रकारची पूजा करतात. पहिला धर्मेश म्हणजे वडील, दुसरा सरन म्हणजे आई आणि तिसरी प्रकृती म्हणजे वन. सरन धर्माचे अनुयायी ‘सरहुल’ सण साजरा करतात. या दिवसापासून त्यांचे नवीन वर्ष सुरू होते.

  • सरना धर्माचे अनुयायी स्वतःला हिंदूंपेक्षा वेगळे समजतात.

वेगळ्या धर्माची गरज का?

  • ब्रिटिश भारतात १८७१ मध्ये पहिली जनगणना झाली. आदिवासींसाठी वेगळी धर्मसंहिता व्यवस्था होती. ही व्यवस्था १९४१ पर्यंत लागू राहिली. स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये जेव्हा पहिली जनगणना झाली तेव्हा आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणजेच ST म्हणजेच अनुसूचित जमाती असे संबोधण्यात आले. जनगणनेत ‘इतर’ नावाने धर्माची वर्गवारी करण्यात आली.

  • २०११ च्या जनगणनेनुसार, देशातील अनुसूचित जमातींची लोकसंख्या १०.४५ कोटींपेक्षा जास्त आहे. यापैकी ८६.४५ लाख लोकसंख्या झारखंडमध्ये आहे. झारखंडमधील २६ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या आदिवासी आहे.

  • २०११ च्या जनगणनेत ७९ लाखांहून अधिक लोक होते ज्यांनी धर्म स्तंभात ‘इतर’ भरले होते. परंतु, इतरांऐवजी ‘सरना’ लिहिणारे ४९ लाखांहून अधिक होते. या ४९ लाखांपैकी ४२ लाख झारखंडमधील होते.

  • सरना धर्मासाठी स्वतंत्र संहितेची मागणी करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, ४५ लाख लोकसंख्येच्या जैन धर्मासाठी वेगळी संहिता असताना ४९ लाख लोकांनी सरना धर्माची निवड केली. मग वेगळा धर्म पाळायला काय हरकत आहे?

  • झारखंड विधानसभेत जेव्हा ‘सरना आदिवासी धर्म कोड बिल’ मंजूर करण्यात आले तेव्हा सोरेन सरकारने आदिवासींना ओळख दिली जाईल आणि त्यांच्या संस्कृती आणि धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण केले जाईल असे सांगितले होते. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे देखील सरना समाजाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com