26/11 ''याद उन्हें भी कर लो'' अविस्मरणीय शौर्याची गाथा!

 26/11  mumbai attack
26/11 mumbai attack
Updated on

26/11 मुंबईतील दहशवादी हल्ल्याला आज 12 वर्ष पूर्ण झाली. 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देश हादरला होता. या हल्ल्यात 166 लोकांनी आपला जीव गमावला होता. 300 हून अधिक नागरिक जखमी झाले आहे.  सीएसटी स्टेशन, ताज हॉटेल, नरीमन हाउस, लियोपोल्ड कॅफे या ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचे मनसुबे 'नाकाम' करण्यासाठी पोलिस एनएसजी जवानांना 3 दिवस संघर्ष करावा लागला होता.  या हल्ल्यामध्ये काही जवानांना हुतात्म्य पत्करावे लागले होते.  एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एनकाउंटर स्पेशलिस्ट  अशी ओळख असलेले  विजय सालसकर, एसीपी अशोक कामटे आणि  तुकाराम ओंबाळे वीरांनी प्राणाची आहूती दिली.  

तुकाराम ओंबाळे
भारतीय सेनेतील  निवृत्तीनंतर मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या तुकाराम ओंबाळे यांनी प्राणाची बाजी लावून कसाबला पकडण्याचे काम केले. २६ नोव्हेंबरच्या रात्री उशिरा कसाबला पकडण्याच्या प्रयत्नात तुकाराम ओंबाळेंना गोळी लागली गोची व त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यावेळी ते चौपाटी परिसरात तैनात होते.  26 जानेवारी 2009 मध्ये भारत सरकारकडून त्यांना अशोक चक्रने सन्मानित करण्यात आले. 

अशोक कामटे 
जवळपास 60 तास दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत अशोक कामटेंनाही हौतात्म्य पत्करले.  अशोक कामटे हे 1989 च्या बॅचचे  आयपीएस अधिकारी होते. दहशतवाद्यांच्या तुलनेत त्यांच्याकडे सामान्य हत्यार असून ते मागे हटले नाहीत. गोळी लागल्यानंतर त्यांना आपले प्राण गमवावे लागले.  

हेमंत करकरे
 1982 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांनाही वीर मरण आले. त्यावेळी करकरे हे  मुंबई एटीएसच्या प्रमुखपदी होते. त्यांच्या रणनितीमुळेच दहशतवादी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश आले होते.  हेमंत करकरे यांनी तीन दहशतवाद्यांचाही खात्म केला.  2009 त्यांनाही मरणोत्तर अशोक चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

विजय साळसकर 
मुंबई हल्ल्यावेळी शहीद होणाऱ्या जवानांम्ये  विजय सालसकर यांचाही समावेश होता. एनकाउंटर स्पेशलिस्ट अशी ओळख असलेल्या साळसकर यांची बड्या बड्या गुंडांमध्ये दहशत होती. जवळपास 80 आरोपींचा खात्मा करणारे साळसकर त्यावेळी अँटी एक्सटॉर्सन सेलमध्ये कार्यरत होते.  26 जानेवारी 2009 मध्ये त्यांनाही मरणोत्तर  अशोक च्रक पुरस्काराने गौरवण्यात आले. 

संदीप उन्नीकृष्णन
पोलिस अधिकाऱ्यांशिवाय संदीप उन्नीकृष्णन या एनएसजी पथकातील जवानालाही दहशतवादी हल्ल्यात गोळी लागली होती. ताजमध्ये दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांवरील करावाईसाठी आलेल्या 10 कमांडोच्या पथकात त्यांचा समावेश होता. तिसऱ्या मजल्यावर असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला केला. त्यावेळी पाठित गोळी लागली होती. यात त्यांना वीर मरण आले. मरणात्तर अशोक चक्रने सन्मानित करण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com