

Shivraj Patil as Lok Sabha Speaker: A Model of Parliamentary Decorum
Sakal
दिल्ली : आज 12 डिसेंबर 2025 रोजी लोकसभेचे माजी सभापती, माजी केंद्रीय गृहमंत्री व पंजाबचे माजी राज्यपाल शिवराज विश्वनाथ पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. या बातमीने हळहळ वाटली अन् त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यात आलेला संपर्क, त्यांच्या राजकीय आयुष्यातील चढउतार यांच्या आठवणी जाग्या झाल्या. स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रांत गृहमंत्रीपद संभाळणाऱ्यात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे, शिवराज पाटील व राज्यमंत्री सोनुसिंग ( सोनुभाऊ दगडूभाऊ पाटील) पाटील या नेत्यांचा समावेश होतो.