ममतादीदींना आणखी एक धक्का; क्रीडा मंत्र्यांच्या राजीनाम्यावर दिली प्रतिक्रिया

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 5 January 2021

तृणमूलमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता 39 वर्षीय शूक्ला यांनी क्रिडा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

कोलकाता- तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress)  आमदार आणि मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला (Laxmi Ratan Shukla) यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमधून मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तृणमूलमधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता 39 वर्षीय शूक्ला यांनी क्रिडा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. 

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल-मे महिन्यात निवडणुका होणार आहे. त्यातच ममता बॅनर्जी यांना अनेक धक्के बसले आहेत. भाजपने ममतांसमोर कडवं आव्हान उभं केलं आहे. न्यूज एजेंसी पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपला राजीनामा सीएम ममता यांच्याकडे पाठवला आहे. याची एक कॉपी राज्यपाल जगदीप धनखड यांना पाठवण्यात आली आहे. क्रिकेटर राहिलेले शुक्ला यांच्या आधी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

new parliament: नव्या संसदेच्या बांधकामाचा मार्ग मोकळा; जाणून घ्या कशी असेल...

पश्चिम बंगालच्या रणजी टीमचे माजी कप्तान आणि हावडाचे आमदार शुल्का यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलंय की, ते राजकारणातून संन्यास घेऊ इच्छित आहे. असे असले तरी शुक्ला यांनी तृणमूल काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. 

ममता बॅनर्जींनी दिली प्रतिक्रिया

राजीमाना कोणीही देऊ शकतं. लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपलं राजीनामा पत्र पाठवलं असून त्यांनी खेळासाठी वेळ देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते आमदारकीवर कायम राहणार आहेत. याला नकारात्मक पद्धतीने घेऊ नका, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trinamool Congress Laxmi Ratan Shukla resign Mamata Banerjee Government