esakal | 23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास?
sakal

बोलून बातमी शोधा

mamta banarjee

तृणमूल काँग्रेस पक्षाची आजच्याच दिवशी 23 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती.

23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास?

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- तृणमूल काँग्रेस पक्षाची आजच्याच दिवशी 23 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन म्हटलंय की, प्रत्येक दिवशी पश्चिम बंगालला चांगले आणि अधिक सक्षम बनवले जाईल. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. त्या म्हणाल्या की त्यांच्या विचारधारेचे तीन आधार आहेत, 'माय, माती आणि माणूस'. 

ममतांना मोठा धक्का; बड्या नेत्यासह 5 हजार कार्यकर्ते भाजपच्या गळाला?

स्थापना दिवस अशावेळी आला आहे, जेव्हा पक्ष राज्यात भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध पाहात आहेत. अनेक तृणमूलचे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. राज्यात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचा जोर पाहता यावेळी तृणमूल काँग्रेसला कडवे आव्हान मिळणार आहे. पार्टीची स्थापना झाल्यापासूनच तृणमूलचे राजकारण 'माय, माती आणि माणूस' या मुद्द्यांभोवती फिरते राहिले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, आज तृणमूलच्या स्थापनेला 23 वर्ष पूर्ण झाले आहेत. 1 जानेवारी 1998 साली आपण याची स्थापना केली होती, तेव्हा पासून आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर मागील वर्ष संघर्षाचे राहिले आहेत. पण आम्ही कायमच लोकांच्या मुद्द्यांसाठी झगडत आलो आहोत.

टीएमसीची स्थापना 1998 साली झाली होती. काँग्रेसमध्ये 25 वर्षापर्यंत राहिल्यानंतर पक्षापासून वेगळ्या झालेल्या ममता बॅनर्जी यांना 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळाली. 2011 मध्ये टीएमसीने 34 वर्षांपासून बंगालची सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या डाव्या पक्षाच्या सरकारला बाहेर फेकलं होतं. 

1998 ते 2011 दरम्यान टीएमसीने स्थानिक पातळीवर खूप संघर्ष केला. नंदीग्राम आंदोलनामध्ये टीएमसीने बजावलेल्या भूमिकेमुळे त्यांना सत्तेपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. टीएमसीला सत्तेत राहून दहा वर्ष पूर्ण होत असताना भाजपकडून कडवा विरोध पाहायला मिळत आहे. यावर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत भाजपने टीएमसीला सत्तेच्या बाहेर ठेवण्याचे लक्ष्य ठेवले आहे.