Video: अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमात गोंधळ; सभागृहाबाहेर कार्यकर्ते भिडले!

टीम ई-सकाळ
Friday, 1 January 2021

गेल्या काही दिवसांपासून भामा-आसखेड योजनेच्या श्रेयवादावरून जोरदार घमासान सुरू आहे. त्यामुळे याचे पडसाद कार्यकर्त्यांच्या आजच्या कृतीमध्ये दिसून आले. 

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर आले होते. 

भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेचा ऑनलाईन लोकर्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ तसेच महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 

Video: 'औरंगाबादचं नामांतर हा भावनिक मुद्दा, काँग्रेस-शिवसेनेच्या वादात आम्हाला पडायचं नाही'

सभागृहात कार्यक्रम सुरू असताना सभागृहाबाहेर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. त्यामुळे बराच वेळ दोन्ही गटात हुल्लडबाजी सुरू होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत होते. परिस्थितीचं भान राखत पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे बऱ्याच काळानंतर कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षाचे समर्थकांमध्येही चांगलेच टशन दिसून आले. भाजप कार्यकर्त्यांनी जय श्री रामच्या घोषणा देण्यास सुरवात केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा दिल्या. 

'मैं कैसा मुसलमां हूं भाई?'; नसरुद्दीन शहा यांचा व्हिडिओ व्हायरल​

गेल्या काही दिवसांपासून भामा-आसखेड योजनेच्या श्रेयवादावरून जोरदार घमासान सुरू आहे. त्यामुळे याचे पडसाद कार्यकर्त्यांच्या आजच्या कृतीमध्ये दिसून आले. 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले, तर हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, अशी टिप्पणी महापौर मोहोळ यांनी केली. तर अजितदादांसोबत कार्यक्रम असला की दोन-चार दिवस भरपूर बातम्या होतात, अशी प्रतिक्रिया दिली. 

भिडे आणि एकबोटेंवर रीतसर कारवाई करणार : गृहमंत्री​

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clashes between NCP and BJP activist in Pune where Ajit pawar and Devendra Fadnavis programmed