तृणमूल कार्यकारिणीची आज बैठक - ममता बॅनर्जी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Trinamool executive meeting today Mamata Banerjee Kolkata

तृणमूल कार्यकारिणीची आज बैठक - ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी ता. ५) तृणमूल काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक बोलाविली आहे. यात नव्या जनसंपर्क मोहिमेची घोषणा होण्याची अपेक्षा आहे.तृणमूलच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पहिला वर्धापनदिन उद्या आहे. पक्षाच्या नव्या कार्यालयात उद्या सायंकाळी बैठक सुरु होईल. तृणमूलच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, पक्षाच्या सर्वेसर्वा ममता यांनी बोलाविलेली बैठक बंदिस्त वातावरणात होईल. सत्ताधारी तृणमूलला वीरभूम हत्याकांड तसेच बलात्काराच्या अनेक प्रकरणांमुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे.

त्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क उपक्रम हाती घेतला जाईल. दीदी के बोलो या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे हा उपक्रम याच धर्तीवर असेल. त्याद्वारे सामान्य नागरिक तक्रारी आणि हरकती नोंदवू शकतील.

शहा यांच्या दौऱ्याचे टायमिंग

गृह मंत्री अमित शहा उद्या कोलकत्यात दाखल होत आहेत. शुक्रवारी सीमा सुरक्षा दलाच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील हिंगलगंज येथील कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे असतील. बांगलादेश सीमेवरील तयारीचा आढावा ते घेतील. दुपारी ते सिलीगुडीला जातील आणि जाहीर सभा घेतील. त्यानंतर ते पक्ष कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. वरिष्ठ नेत्यांनी पक्षाची राज्य शाखा भक्कम करण्याचे आवाहन वारंवार केले आहे. अलीकडेच झालेल्या दोन पोटनिवडणुकांत तृणमुलची बहुमताने सरशी झाली. हे दोन संदर्भ या दौऱ्याला आहेत.

आझाद तृणमूलचे गोवा प्रभारी

कोलकता : तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रभारीपदी कीर्ती आझाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटच्या मैदानातून राजकारणात प्रवेश करणाऱ्या आझाद यांनी गेल्यावर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. सध्या तृणमूलचे गोव्याचे प्रभारी असलेले खासदार माहुआ मोईत्रा यांच्या जागी आझाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू होईल, असे पक्षाने एका निवेदनात म्हटले आहे. गोव्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमल काँग्रेसला यश मिळाले नाही.

Web Title: Trinamool Executive Meeting Today Mamata Banerjee Kolkata

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top