मोदी सरकारने घेतला आणखी एक महत्त्वाचा निर्णय

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

1954 मधील राष्ट्रपतींच्या आदेशात करण्यात आला बदल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली. तसेच जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवटही सहा महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबतची माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. 

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये तोंडी तलाकविरोधी विधेयकास मान्यता देण्यात आली असून, आता हे विधेयक येत्या अधिवेशनात सादर केले जाणार आहे. जुन्याच अध्यादेशाचे रुपांतर विधेयकात करण्यात येईल. याशिवाय जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक 2019 ला मान्यता देण्यात आली. त्यामुळे येथील आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले. 

1954 मधील राष्ट्रपतींच्या आदेशात बदल

आरक्षण लागू करण्यासाठी 1954 मधील राष्ट्रपतींच्या आदेशात केंद्रीय मंत्रिमंडळाने बदल केला आहे. त्यामुळे आता जम्मू काश्मीरमध्ये राहणाऱ्या नागरिकांसोबतच आंतरराष्ट्रीय सीमेवर राहणाऱ्या नागरिकांनाही आरक्षण मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Triple Talaq Bill Approves In First Union Cabinet Meeting